Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Oxygen tanker accident मोहोळ : सकाळची घटना; ऑक्सीजन टँकरची जीपला जोरात धडक; अनर्थ टळला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

Oxygen tanker accident मोहोळ : सकाळची घटना; ऑक्सीजन टँकरची जीपला जोरात धडक; अनर्थ टळला

Surajya Digital
Last updated: 2022/05/15 at 7:48 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ आत्महत्या करण्याचा डाव फसला; चव्हाण वाडी येथील घटना■ गुरांना वाचविताना झाडावर आदळली कार; 3 ठार

सोलापूर – पुढच्या वाहनाला ओव्हरटेक करणाऱ्या बोलेरो जिपला पाठीमागून येणाऱ्या ऑक्सीजन टॅंकरने जोराची धडक देऊन अपघात झाला, यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही,वा कोणी जखमी नाही, मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. Mohol: Morning incident; Oxygen tanker jeep hit hard; Disaster averted

ही घटना यावली (ता मोहोळ) शिवारातील एका पेट्रोल पंपाजवळ आज रविवारी ( ता १५) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. या संदर्भात मोहोळ पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी की, पिंपळखुटे (ता माढा) या ठिकाणावरून सोलापूरच्या दिशेने जाणारी बोलेरो जिप (क्रमांक एम एच ४५ एन १९१६) ही यावली शिवारात समोरच्या वाहनाला अचानक ओव्हरटेक करत असताना पाठीमागून येणारा टॅंकर (क्रमांक एच आर ३८ वाय ०९९६) याने जिप मध्ये असणाऱ्या लोकांना वाचविण्याच्या नादात अचानक ब्रेक दाबला.

मात्र ब्रेक न लागल्याने टॅंकरने जिपला धडक देऊन पुन्हा दोन्ही वाहने दुभाजकावर जाऊन आदळली. त्यात टॅंकर रस्त्यावर पलटी झाला. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून टॅंकर चालकाच्या सतर्कतेमुळे जिपमधील सर्व नागरीक सुखरूप बचावले. त्यामुळे मोठी जीवीतहानी टळल्याची माहिती प्रथम दर्शनी अपघात बघणाऱ्या ग्रामस्थांनी दिली.

दरम्यान टॅंकरमध्ये ऑक्सीजन वायु होता. टॅंकर उचलताना कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून मोहोळ पोलीस ठाण्यातील अपघात पथकाचे सहाय्यक फौजदार जे एन पवार यांनी पुणे येथील ऑक्सीजन तज्ञांना पाचारण केले. ते घटनास्थळी आल्यावर त्यांनी सर्व परिस्थितीची पाहणी केली व धोका नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर टॅंकर क्रेनच्या सहाय्याने उचलून रस्त्याच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

याबाबत मोहोळ पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

□ आत्महत्या करण्याचा डाव फसला; चव्हाण वाडी येथील घटना

सोलापूर : चव्हाणवाडी (ता.तुळजापूर) येथे राहणाऱ्या गोविंद डाकू गायकवाड (वय ५५) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. गोविंद याने आज दुपारी घरातील छताच्या लाकडी वाशाला दोरीने गळफास घेतला होता. हा प्रकार उघडकीस येताच त्याला फासातून सोडवून शशिकांत (भाऊ) यांनी काडगाव येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची प्राथमिक नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे .

 

■ गुरांना वाचविताना झाडावर आदळली कार; 3 ठार

जळगाव : जिल्ह्यातील पळासखेड्या येथे गुरांना वाचवण्याच्या प्रयत्नात कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तरवाडे गावाकडे कारमध्ये जात असताना रस्त्यावर समोरून येणाऱ्या गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात असताना वाहनाच्या वेगाचा अंदाज न आल्याने ही कार रस्त्याच्या बाजूस असलेले निंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Mohol #yawali #Morning #incident #Oxygen #tanker #jeep #hithard #Disaster #averted, #मोहोळ #यावली #सकाळ #घटना #ऑक्सीजन #टँकर #जीप #धडक #अनर्थ #टळला
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article धक्कादायक – प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह आढळला
Next Article Ujani light water चंद्रभागेत भरणेमामांच्या नावाने ‘म्हसोबा’ची स्थापना; आंदोलनाची तीव्रता वाढणार

Latest News

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर
राजकारण June 26, 2025
आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही; सरकारकडून सायबर फ्रॉड कॉलर ट्यून बंद
Top News June 26, 2025
‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?