Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । सापळ्यात अडकल्याचे लक्षात येताच तलाठ्याने पैसे घेऊन ठोकली धूम
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर । सापळ्यात अडकल्याचे लक्षात येताच तलाठ्याने पैसे घेऊन ठोकली धूम

Surajya Digital
Last updated: 2023/03/30 at 5:36 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

सोलापूर – सात हजार रुपयांची लाच घेतल्यानंतर आपण लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सापळ्यात अडकलो आहोत हे लक्षात आल्यावर तलाठ्यानं पैसे घेऊन चार चाकी वाहनातून धूम ठोकली. Realizing that he was trapped, Talatha took the money and knocked on the Solapur Mangalvedha district office

मंगळवेढा प्रांत कार्यालयात हायवेच्या भूसंपादन मोबदला वाटपाचे काम पाहणाऱ्या तलाठी सुरज रंगनाथ नळे यांने ७ हजार रुपयांची लाच घेतली असून त्याने लाचेची रक्कम घेऊन घटनास्थळावरून फिल्मी स्टाईलने धूम ठोकली. खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण यास एसीबीने गजाआड केले आहे. याप्रकरणी तलाठी सुरज रंगनाथ नळे व खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

 

लाचलुचपत अधिकाऱ्यांना अखेर तलाठ्याचा साथीदार खाजगी व्यक्तीस ताब्यात घ्यावं लागलं. हा प्रकार काल सायंकाळी मंगळवेढा हद्दीत घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार आणि त्यांच्या मित्राच्या शेतीमधून राष्ट्रीय महामार्ग सांगली – सोलापूर जात आहे. यात शेत जमिनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधित होत आहे. याचे नुकसान १ लाख ४४ हजार रुपये मंजूर झाले आहे पण मंजुरी दाखला देण्यासाठी तलाठ्यानं मध्यस्ताच्या माध्यमातून सात हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारत असताना तलाठ्याला आपण सापळ्यात अडकलो आहोत हे लक्षात आलं. तेव्हा त्यानं ७००० ची रक्कम घेऊन स्वतःच्या चार चाकी गाडीतून तातडीने पोबारा केला.

लाचलुचपत अधिकाऱ्यांनी तलाठी सुरज रंगनाथ नळे उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगळवेढा यांच्या कार्यालय आणि घराजवळ सापळा लावला. मात्र सुरज नळे हे संबंधितांना पाहून तेथून वेगाने निघून गेले. लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या खाजगी इसम पंकज महादेव चव्हाण याला त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं आहे. उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक यांच्या पथकाने हा सापळा लावला होता. तलाठ्याचा शोध सुरू आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

 

सोलापूर : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर दीड वर्षांपासून अत्याचार करत तिला गर्भवती केल्याप्रकरणी नईम शेख (रा.सोलापूर) याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान पीडितेने एका मुलीला जन्म दिला आहे. आरोपी नईम याने पीडितेशी जवळीकता साधत तिची ओळख वाढवली. त्यानंतर तिला घरात कोणी नसताना घरी बोलावून मागील दीड वर्षांपासून अनेक वेळा अत्याचार केला.

 

काही दिवसानंतर पीडिता ही गर्भवती राहिली. ही बाब पीडितेने आपल्या आई वडिलांना सांगितली नाही. एके दिवशी तिच्या पोटात जास्त दुखू लागल्याने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता नुकतेच पीडितेने मुलीला जन्म दिला आहे. या प्रकरणी पीडितेने फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा तपास पोलिस करत आहेत.

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Realizing #trapped #Talatha #took #money #knocked #Solapur #Mangalvedha #districtoffice, #सोलापूर #सापळा #अडकला #लक्षात #तलाठी #पैसे #ठोकली #मंगळवेढा #धूम
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article RamNavami रामनवमी । अयोध्या राममंदिराच्या गर्भगृहासाठी महाराष्ट्रातील सागवान लाकडाचा वापर
Next Article संपात सहभागी झालेल्या सर्व 18 लाख कर्मचाऱ्यांचा पगार कापणार

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?