उपनिंबधक किरण गायकवाड यांच्या आदेशानुसार
सोलापूर/प्रतिनिधी ; उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर येथील राणी जाधव या नियमबाह्य सावकारी करीत असल्याची तक्रार उपनिबंधक कार्यलय सोलापूर याना येथील दशरथ शिंदे राहणार हगलूर उत्तर सोलापूर यांनी दिली होती.त्यानुसार तपासणी केली असता त्यांच्या घरात हगलूर येथील दिनांक ०७/०४/२०२५ रोजी घराची झडती घेतली असता अवैध सावकारीच्या अनुषंगाने त्यांचे घरामध्ये तक्रारदार यांचे वडिल कै. दशरथ दिगंबर शिंदे यांनी लिहून दिलेले रु.५० चे दोन स्टँप पेपर,
व्याजाच्या नोंदी असलेले नोंद वहया इत्यादी दस्तऐवज आढळून आल्याने राणी मोहन जाधव हे वैध अनुज्ञप्ती शिवाय सावकारी व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर महाराष्ट सावकारी (नियमन) अधिनियम नुसार सोलापूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश किरण गायकवाड यांनी दिले आहे.
सावकारांचा निबंधक,सहाय्यक निबंधक तथा सहाय्यक उपनिबंधक दत्तात्रय भवर यांचे मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख पी.आर. संकद, ए.एस. पुजारी, विक्रम गौड, एस.बी. कासार यांच्या पथकाने हे कार्यवाही केली आहे. श्रीमती राणी मोहन जाधव
त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ व ४१ (ग) अन्वये सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक ७ एप्रिल २०२५ रोजी पी. आर. संकद, मुख्य लिपीक यांनी शासकीय फिर्याद दाखल केलेली आहे.