Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतर जास्त अँटीबॉडी तयार होतात

Surajya Digital
Last updated: 2021/05/21 at 11:09 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या डोसमुळे शरीरात अधिक अँटीबॉडी तयार होतात, असा दावा ICMR चे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी केला आहे. याबाबत संशोधन झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामुळेच कोव्हिशिल्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जवळपास 12 आठवड्यांचं अंतर आहे. तर कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर 4 आठवड्यांचं ठेवण्यात आलं आहे, असं डॉ. बलराम भार्गव यांनी नमूद केलं आहे.

कमाईची सुवर्णसंधी; मोदी सरकार शेती सोलार पॅनलला देणार पैसे, नापीक जमीन शेतकर्‍यांच्या उत्पन्नाचे स्रोत होणार
https://t.co/4Wde5vG4sd

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021

कोव्हॅक्सिनपेक्षा कोव्हिशिल्ड कोरोना लसीच्या पहिल्या डोसमुळे शरीरात अधिक अँटीबॉडी तयार होत असल्याचा दावा करण्यात आलाय. हा दावा स्वतः इंडियान काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी केलाय. हे सांगताना त्यांनी याबाबत संशोधन झालेलं असून त्यात हे स्पष्ट झाल्याचंही नमूद केलंय. ते कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर का वाढवण्यात आलं या प्रश्नाचं उत्तर देत होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

‘ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल त्या दिवशी मी या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणारच’ https://t.co/zaTjnlJLFU

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021

डॉ. बलराम भार्गव म्हणाले, “कोव्हॅक्सिनच्या पहिल्या डोसनंतर फार जास्त अँटीबॉडी तयार होत नाही. कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसनंतर या अँटीबॉडी तयार होतात. कोव्हिशिल्डबाबत मात्र नवा अहवाल समोर आलाय. यात कोव्हिशिल्डच्या पहिल्या डोसनंतरच शरीरात चांगल्या प्रमाणात अँटीबॉडी तयार होत असल्याचं आढळलं आहे. ICMR ने याबाबतची आकडेवारी आणि माहिती तपासली आहे. 3 समित्यांनीही ही माहिती पाहिली आणि चर्चा केली. कोव्हिशिल्ड कोरोना लस निर्मात्यांसोबत यावर चर्चा झाली.

आता घरीच करा कोरोना टेस्ट, पुण्यातील होम टेस्टिंग किटला मंजुरी https://t.co/y5fMX9C8Xl

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021

“ICMR चे तज्ज्ञ, 3 समित्या आणि कोरोना लस निर्मात्यांशी चर्चा केल्यानंतरच कोव्हिशिल्डच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये जवळपास 12 आठवड्यांचं अंतर ठेवण्याचं सूचवण्यात आलंय. कोव्हॅक्सिनच्या दोन डोसमधील अंतर 4 आठवड्यांचं असणार आहे,” असंही डॉ. बलराम भार्गव यांनी नमूद केले.

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच; ऑनलाइन की ऑफलाइन ? https://t.co/cpxFtupAX4

— Surajya Digital (@SurajyaDigital) May 20, 2021

You Might Also Like

तामिळनाडू : पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली

भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ प्रमाणे इस्रायलने गुप्तपणे इराणी लष्करी कमांडरला मारले ठार

पंतप्रधान मोदी २ ते ९ जुलै दरम्यान ५ देशांच्या दौऱ्यावर

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

TAGGED: #More #antibodies #Produced #firstdose #covachield #covacin, #कोव्हॅक्सिनपेक्षा #कोव्हिशिल्डच्या #पहिल्या #डोसनंतर #जास्त #अँटीबॉडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पूर्व विभाग सिनेमा , पद्माचे किस्से
Next Article गंभीर संकेत! कोरोनातून बरे झाल्यावर जास्त भूक लागते का ?

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?