Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माय-लेकींची गळफासाने आत्महत्या, पण कुठे ? नेमकं कसे घडले ‘हे’ ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

माय-लेकींची गळफासाने आत्महत्या, पण कुठे ? नेमकं कसे घडले ‘हे’ ?

admin
Last updated: 2025/03/28 at 12:09 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर-विशेष प्रतिनिधी
मायलेकीच्या आत्महत्येने तुळजापूर शहर हादरले आहे. तुळजापूर शहरातील गवते प्लॉटिंग येथे राहणार्‍या रत्नमाला संजय पवार, वय 45, रा करंजे ता. करमाळा हल्ली मुक्काम तुळजापूर आणि त्यांची नवविवाहित मुलगी प्रतीक्षा तुषार पाटील, वय 23 रा. सापटणे ता. टेभुर्णी असे आत्महत्या केलेल्या माय – लेकींची नावे आहेत. या दोघींनी राहत्या घरामध्ये आतून कडी लावून गळफास घेतला.प्रतिक्षाचा विवाह सहा महिन्यांपूर्वी एका शेतकरी मुलाशी लावून दिल्याबद्दल ती अस्वस्थ होती.त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.

अनेक मुली सध्या आपला होणारा नवरा नोकरदार असावा, अधिकारी असावा, अशी अपेक्षा ठेवतात. नोकरदार, अधिकारी या मुलांना अनेकदा नवरा म्हणून मुलींची पसंती मिळते. तर दुसरीकडे शेतकरी मुलगा नवरा म्हणून नको असल्याचे म्हणत शेतकरी मुलांना नकार मिळत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. परंतु एखाद्या शेतकरी मुलाच्या घरची परिस्थिती चांगली असेल, तर आपली मुलगी सुखी आणि आनंदी राहील, या हेतूनेच मुलीचे आई – वडील मुलीच्या सुखासाठी मुलीचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून देतात अशा घटना समोर आहेत. असाच एक प्रकार समोर आला असून यातून भयंकर, धक्कादायक पाऊल मुलीने उचलल्याची घटना घडली

नेमकं काय घडले?
असाच एक प्रकार तुळजापूर शहरात घडला आहे. आपल्या मनाविरुद्ध शेतकरी मुलासोबत लग्न लावून दिल्याने नवविवाहित तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 6 महिन्यांपूर्वी मुलीचे एका शेतकरी मुलाशी लग्न लावून देण्यात आले होते. पण 23 वर्षीय नव-विवाहितेने आपल्या आईसह नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली. आपल्या इच्छे विरुद्ध शेतकरी मुलासोबत लग्न लावण्यात आले, ही गोष्ट असह्य झाल्यामुळे तरुणीने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे.

ही घटना समजताच पोलीस निरिक्षक आण्णासाहेब मांजरे, पोलीस उपनिरिक्षक विजय थोटे, तपास अंमलदार शिखारे हे घटनास्थळी हजर झाले.सदर घटनेबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आले नाही. मात्र्ा केवळ शेतकरी मुलाबरोबर लग्न लावलं म्हणून टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सर्वत्र्ा आहे. मात्र्ा मूळ कारण अजूनही अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Phatatewadi Gram Panchayat फटातेवाडी ग्रामपंचायत अपहार प्रकरणी ‘हा’ गेला बाराच्या भावात…नोकरीला मुकला
Next Article सेलिब्रिटीज साई बाबांच्या भक्तांसाठी जेवण बनवणार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?