Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पंढरपूरमध्ये मुलाला मारून आईने घेतला गळफास; परिसरात खळबळ
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

पंढरपूरमध्ये मुलाला मारून आईने घेतला गळफास; परिसरात खळबळ

Surajya Digital
Last updated: 2022/05/06 at 8:12 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पंढरपूर : पंढरपूर शहरालगत असलेल्या भिमा‌नदीच्या तीरावर  अज्ञात महिलेने  स्वत:च्या मुलाला मारुन स्वत:   झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी सात  वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. Mother strangles child in Pandharpur; Excitement in the area

 

या दोन्ही अनोळखी व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक मिलींद मोहिते यांनी दिली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत असलेल्या महिलेच्या अंगावर जुने भाजलेले व्रण आहेत. सदर महिलेचे (वय 35 वर्षे) तर मुलाचे ( वय 10 वर्षे) आहे. मृत महिला व मुलगा अज्ञात असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात  मिसिंग व्यक्ती कोण आहेत का याची चौकशी सुरु आहे. या आत्महत्येच्या घटनेचे कारण समजले नाही. घटनेचा पुढील तपास पंढरपूर तालुका पोलिस करीत आहेत.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

https://www.facebook.com/109399567404448/posts/535141901496877/

 

■ अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला २० वर्षे सक्तमजुरी

》 ११ महिन्यांत निकाल, पीडितेस दोन लाखांची भरपाई

सोलापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. लिंगराज नागेश गणप्पा (वय २५, रा. चाकोते नगर, विडी घरकुल) असे आरोपीचे नाव आहे.

२६ जून २०२१ रोजी आरोपीच्या दुकानात अत्याचाराची घटना घडली होती. पीडित मुलगी बडीशेप घेण्यासाठी दुकानात आली होती. ती १५ ते २० मिनिटे झाली तरी घरी न परतल्याने आजीने दुकानाकडे येऊन मुलीला आवाज दिला. त्यावेळी आरोपी लिंगराज मुलीला बाहेर घेऊन आला. मुलगी घाबरलेली दिसत असल्याने आजीने विचारणा केली. मुलीने अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. ए. मोरे यांनी केला. ११ ऑगस्ट २०२१ रोजी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल केले.

विषेश न्यायाधीश श्रीमती यु.एल. जोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. अ‍ॅड. प्रकाश जन्नू यांनी बाजू मांडली. पीडिता ही घटनेच्या वेळी अल्पवयीन होती. आरोपीला हे माहीत असूनही त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे

वकिलांनी साक्ष व पुराव्याच्या आधारे निदर्शनास आणून दिले. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ (२) अन्वये आरोपीस दोषी धरण्यात आले. त्याला २० वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्याची शिक्षा सुनावली. पीडित मुलीला नुकसान भरपाई म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या योजनेतून दोन लाख रुपये देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. घटनेच्या ११ महिन्याच्या आत पीडितेस व तिच्या कुटुंबास न्याय मिळाला. आरोपीच्या वतीने ॲड. हेमंतकुमार साका यांनी काम पाहिले.

□ पीडितेस दोन लाखांची भरपाई

सुनावणी जलदगतीने होऊन घटनेच्या ११ महिन्याच्या आत विशेष न्यायालयाने निकाल देऊन एकप्रकारे पीडितेस व तिच्या कुटुंबीयास लवकर न्याय दिला आहे. पीडितेस नुकसान भरपाई म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या योजनेतून दोन लाख रुपये देण्याचा आदेश विशेष न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दिला आहे.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/535239891487078/

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Mother #strangles #child #Pandharpur #Excitement #area, #पंढरपूर #मुलाला #मारुन #आई #गळफास #परिसरात #खळबळ
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article fundamental right मशिदीत लाऊडस्पीकर लावणे हा मूलभूत अधिकार नाही : हायकोर्ट
Next Article जमीन खरेदी करणा-यांसाठी बातमी, ‘तुकडाबंदी’ बाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?