मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, चित्रलेखाचे (मराठी) संपादक व नाट्य निर्माता संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव यांच्या मातोश्री सुशीला रामकृष्ण महाराव यांचे काल रविवारी दुपारी निधन झाले. त्या ९४ वर्षांच्या होत्या. त्यांनी शिक्षिका ३७ वर्षे काम केले. मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शनिवारी संध्याकाळी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी दुपारी ३ वाजता सुशीला महाराव यांचे निधन झाले. त्यांच्यावर शिवाजीपार्क विद्युतदाहिनीत रविवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पाच मुलगे, दोन मुली, सुना आणि नातवंडे आहेत. १९४८ मध्ये मुंबई महापालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या. १९८५ मध्ये सुशीला महाराव मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाल्या.