Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी खासदाराला तुरुंगवासाची शिक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीराजकारण

निवडणुकीत पैसे वाटल्याप्रकरणी खासदाराला तुरुंगवासाची शिक्षा

Surajya Digital
Last updated: 2021/07/25 at 5:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

हैदराबाद : मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी एका खासदाराला दोषी ठरविण्यात आले आहे. तेलंगाणातील महबूबाबादच्या तेलंगाणा राष्ट्रीय समिती (TRS) च्या खासदार मलोत कविता यांना मेट्रॉपॉलिटीन कोर्टाने दोषी ठरवले आहे. कविता यांना 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान पैसे वाटले होते. कोर्टाने त्यांना दहा हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. ही देशातील पहिलीच घटना आहे.

मतदारांना पैसे दिल्या प्रकरणी तेलंगना राष्ट्रीय समितीच्या खासदार मलोत कविता यांना नामपल्लीतील विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. कविता या तेलंगनातील महबूबाबादच्या खासदार आहेत. त्यांच्या एका सहकाऱ्यालासुद्धा या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून शिक्षा सुनावली आहे. मलोत कविता यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळ मतदारांना पैसे दिल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे.

पोलिसांनी सुनावणीदरम्यान फ्लाइंग स्काव्डच्या अधिकारी आणि त्यांच्या रिपोर्टला पुरावा म्हणून सादर केले. चौकशीदरम्यान शौकत अलीने आरोप मान्य करत कविता यांच्या सांगण्यावरुन पैसे वाटल्याचे कबुल केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

यासाठी त्यांना सहा महिन्याचा तुरुंगवास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र, आरोपींना उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी कविता लवकरच तेलंगणा उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करणार आहेत.

2019 मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी कविता यांचे सहकारी शौकत अली हे पैसे वाटत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले होते. कविता यांना मत देण्यासाठी शौकत अली बर्गमपहाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मतदारांना 500 रुपये देत होते. शौकत अली यांना पोलिसांनी रंगेहात पकडलं आणि लाच प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये कविता यांनाही आरोपी करण्यात आलं आहे.

पोलिसांनी सुनावणीवेळी फ्लाइंग स्काव्डच्या अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून हजर केलं. तर त्यांनी तयार केलेला अहवाल पुरावा म्हणून दिला. चौकशी केल्यानंतर शौकत अली यानेही गुन्हा कबूल केला आहे. तसंच कविता यांच्या सांगण्यावरून पैसे वाटल्याचा दावाही केला.

तेलंगणात याआधीही विशेष सत्र न्यायालयाने नेत्यांना शिक्षा सुनावली आहे. यामध्ये भाजपचे आमदार राजा सिंह आणि टीआरएस आमदार दानम नागेंद्र यांनाही तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. राजा सिंह यांच्यावर पोलिसा ठाण्यात एका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा होता तर दानम नागेंद्र यांना फसवणुकीच्या एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #MP #jailed #distributing #election #money, #निवडणुकीत #पैसे #वाटल्याप्रकरणी #खासदाराला #तुरुंगवासाची #शिक्षा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिप; भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकला सुवर्णपदक
Next Article सोलापूर व कोल्हापुरात विस्तारलेल्या लक्ष्मी उद्योग समूहचे आण्णासाहेब पाटील यांचे निधन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?