Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लिफ्टमध्ये मुलांना एकट सोडू नका, दरवाज्यात अडकून मुंबईत चिमुकल्याचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

लिफ्टमध्ये मुलांना एकट सोडू नका, दरवाज्यात अडकून मुंबईत चिमुकल्याचा मृत्यू

Surajya Digital
Last updated: 2020/11/29 at 9:39 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : लिफ्टमधून बाहेर येत असतानाच दरवाजात अडकून खाली पडल्याने गंभीररित्या जखमी होऊन एका ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धारावीतील पालवाडी येथे घडली आहे. या दुर्घटनेमुळे लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असून त्यात संशयास्पद असे काहीही आढळलेले नाही. लिफ्टमध्ये मुलांना एकटे सोडू नये तसेच लिफ्टमनशिवाय लिफ्टचा वापर करू नये, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगावणे यांनी केले आहे.

धारावी क्रॉस रोडवरील पालवाडी येथील कोझी शेल्डर बिल्डिंगमध्ये काल शनिवारी दुपारी १२.४५ वाजता ही घटना घडली. या घटनेत मृत पावलेल्या मुलाचे नाव मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख असे आहे. ही बिल्डिंग सात मजली असून चौथ्या मजल्यावर शेख कुटुंब वास्तव्याला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* अशी घडली दुर्दैवी घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोझी शेल्टर बिल्डिंगमधील रूम नं.४०२ मध्ये राहणारा मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख हा मुलगा त्याची ७ वर्षांची मोठी बहीण व ३ वर्षांची लहान बहीण यांच्यासोबत तळमजल्यावरून बिल्डिंगच्या लिफ्टमधून घरी चालले होते. लिफ्ट चौथ्या मजल्यावर पोहचल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणी लिफ्टचा लोखंडी दरवाजा सरकवून व बाहेरील लाकडी सेफ्टी दरवाजा उघडून बाहेर गेल्या. त्यानंतर हुजेईफा हा बाहेर जात असतानाच दुर्घटना घडली. लिफ्टचा लोखंडी दरवाजा बंद करत असताना त्याला लगेच पुढे जाता आले नाही आणि लाकडी सेफ्टी दरवाजा बंद होऊन लिफ्ट सुरू झाली. त्यामुळे हा मुलगा लिफ्टचा लोखंडी दरवाजा आणि लाकडी दरवाजा यामध्ये अडकला व लिफ्ट वर जाताच खाली मोकळ्या जागेत कोसळला. या दुर्घटनेत गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज फारच धक्कादायक असून लिफ्टच्या सुरक्षिततेचा प्रश्नही त्यामुळे ऐरणीवर आला आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #लिफ्टमध्ये #मुलांना #एकटसोडूनका #दरवाज्यात #अडकून #चिमुकल्याचा #मृत्यू
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article लसीचे वितरण पहिल्यादा भारतातच; कोरोना लस सरकारला 250 रुपयांना घ्यावी लागणार
Next Article दोन मजली गोठ्यात 60 म्हशींचा सांभाळ करत ‘श्रद्धा’ लावतीय कुटुंबाला ‘हातभार’

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?