Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जागतिक वडापाव दिन कधी सुरु झाला? कोणत्या राजकीय पक्षाने ब्रॅण्डींग केले, वाचा सविस्तर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

जागतिक वडापाव दिन कधी सुरु झाला? कोणत्या राजकीय पक्षाने ब्रॅण्डींग केले, वाचा सविस्तर

Surajya Digital
Last updated: 2020/08/23 at 6:09 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : जागतिक वडापाव दिन कधी सुरु झाला? हा प्रश्न अनेकजणांना पडला असला, तरी दादर स्टेशनाबाहेर 1966 साली अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला, असं म्हटलं जातं. वाचा सविस्तर कसा आहे हा प्रवास.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

23 अॉगस्ट 1966 साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली.

आज 23 ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिन. मुंबईला वडापाव या खाद्यपदार्थासाठी ओळखलं जातं. भारताचा राष्ट्रीय खाद्य पदार्थ म्हणून खिचडीला मानलं जातं. तसेच मुंबई शहराचा वडापाव हा भारताच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. मुंबईचा वडापाव हा अनेकजण फार आवडीने खातात.

वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो १० पैशाला विकला जायचा. आज वडापाव पाच रुपयांपासून तर मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत मिळतो. आज वडापाव हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. मुंबई हा खाद्यपदार्थ हा परदेशातून आलेल्या पर्यटकांना सुद्धा आवडतो.

* मुंबईसाठी अतिशय प्रिय खाद्यपदार्थ

मुंबईत अनेकजण ऑफिसला जाताना वडापाव खातात. ऑफिसवरून परत घरी जात असतांना भूक लागली असेल, तर वडापाव खाऊन आपली भूक मिटवितात. वडापाव विक्रेता हे दुपारी दोनच्या सुमारास गाडी लावतात. दादर, परळ, गिरगाव, सीएसटी या ठिकाणी मराठी उपाहारगृहांमध्ये फार कमी दरात वडापाव मिळतो. मात्र सुरुवातील बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पावाने कधीपासून साथ दिली याबद्दल मतमतांतरे आहेत. दादर वगैरे परिसरातील गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थाला चांगलेच उचलून धरले.

वडापाव हा मुंबईसाठी अतिशय प्रिय खाद्यपदार्थ आहे. गरीबांपासून ते श्रीमंतापर्यंत प्रत्येकाजण आवडीने वडापाव खातात. मुंबईत गिरणी कामगारांसाठी वडापाव फार आवडते खाद्य ठरले होते. कारण वडापावला खायला काही प्लेट लागत नाही, ना चमचा. जितकं लवकर बनतो, तितक्याच लवकर खाल्लाही जातो.

* शिवसेनेने वडापावचे ब्रॅण्डींगच केले

शिवसेनेने मुंबईमधील दादर, माटुंग्यासारख्या परिसरामध्ये असणाऱ्या उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने वडापाव प्रमोट कऱण्यास सुरुवात केली. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा, असे आव्हान शिवसेनेने केले.


शिवसेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच घोषित करून टाकले. शिववडा हा याच पाठिंब्यातून जन्माला आला वडापाव. महानगरपालिकेच्या सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनविले. एकाप्रकारे वडापावला राजकीय पाठिंबाच दिला. आज अनेक ठिकाणी ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये कॉलेजमध्ये वडापाव दिसतो. या वडापावला अनेकजण फार आवडीने खातात.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #वडापाव #जागतिकवडापावदिन #शिवसेना #मुंबई #वैद्य #1966
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाच्या महामारीतही आयपीएलचा फिव्हरचा जोर; धोनी विरुद्ध शर्मा वाद रंगला, सेहवागने फटकारले
Next Article महाविकास आघाडीतील ११ आमदार बसणार उपोषणाला; निधी वाटपात भेदभावचा आरोप, विघ्न वाढले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?