Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

मुंबई : लोकलमध्ये मोटरमन केबिनमध्ये असणार आता सीसीटीव्ही कॅमेरा

admin
Last updated: 2025/06/23 at 3:19 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 23 जून (हिं.स.)।लोकलमध्ये सुरक्षितता वाढविण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आता मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम सुरू केले आहे. सध्या मध्य रेल्वेच्या २५ लोकलमध्ये ५० सीसीटीव्ही यंत्रणा बसवल्या आहेत.मुंब्रा अपघातानंतर हे काम रेल्वेने फास्ट ट्रॅकवर आणले आहे.

मुंबईतील आणखी १५ लोकलसाठी ३० यंत्रणा ऑर्डर करण्यात आल्या आहेत. एका लोकलमधील दोन मोटरमन केबिनसाठी अंदाजे १.२४ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पश्चिम रेल्वेच्या २६ लोकलमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या मोटरमनचा या यंत्रणेला विरोध होता. परंतु, आता हे काम रेल्वेने फास्ट ट्रॅकवर आणले आहे.अपघात झाल्यास मोटरमनची कृती, त्याचा प्रतिसाद हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमधून तपासले जाऊ शकते. मोटरमनवर असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीची नोंद ठेवता येते. त्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य धोरण ठरवता येणार आहे. यासाठी लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबई लोकलने प्रवास करताना अनेकदा प्रवाशांचे ट्रेनमधून पडून किंवा रूळ ओलांडताना अपघाती मृत्यू होतात. अनेकदा अपघातांचे कारण स्पष्ट होत नसल्याने रेल्वे प्रशासनाला याची कारणे शोधता येत नाहीत. तसेच प्रवाशांना नुकसान भरपाई देताना रेल्वेला त्यांची बाजू कोर्टामध्ये स्पष्टपणे मांडता येत नाही.आता या कॅमेऱ्याच्या माध्यमातून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास मदत मिळू शकेल. यामध्ये अपघातादरम्यान बाह्य बाबींचा समावेश आहे का ? प्रवाशांची चूक आहे का ? अपघातावेळी मोटरमनचे लक्ष कुठे होते ? त्याने सर्व सूचनांचे पालन करतानाच सर्व सिग्नल पाळले आहेत का ? अशा अनेक बाबी तपासणे शक्य होईल.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदींनी कलम ३७० हटवून डॉ. मुखर्जी यांचा संकल्प पूर्णत्वास नेला – रविंद्र चव्हाण
Next Article सोने तस्करी प्रकरणी मुंबईत दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक

Latest News

По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Živa ruleta v spletnih igralnicah v Sloveniji – Vodnik za igralce
Top News December 5, 2025
Зачем мы останавливаемся на размеренные отдых
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?