रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे गॅस टँकर उलटल्यामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. अखेर ग्रामस्थांशी चर्चेनंतर आणि नुकसानभरपाईची हमी मिळाल्यानंतर सकाळी १०:१० वाजता वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
हातखंबा गावाजवळ टँकर अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीला आणि काही दुचाकींना धडकला. या अपघातात दुचाकींचे मोठे नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, शिवसेना नेते बाबू म्हाप आणि महामार्ग ठेकेदाराचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. चार दिवसांपूर्वीच या भागात झालेल्या अपघातामुळे संतप्त ग्रामस्थांनी पुन्हा रस्ता रोको आंदोलन केले होते. मात्र रुग्णवाहिका येताच आणि नुकसानभरपाई देण्याची तयारी ठेकेदाराने दर्शवल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
