Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली,लातूर, पुणे जिल्ह्यातील उबाठा गटांचे पदाधिकारी शिवसेनेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली,लातूर, पुणे जिल्ह्यातील उबाठा गटांचे पदाधिकारी शिवसेनेत

admin
Last updated: 2025/03/27 at 3:09 PM
admin
Share
2 Min Read
Mumbai shivsena shinde
SHARE

मुंबई, 27 मार्च (हिं.स.)उबाठा गटातील मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे, लातूरमधील विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. यात सांगलीचे जिल्हाप्रमुख संजय विभूते आणि सोलापूरचे माजी संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी शिंदे यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यात प्रामुख्याने वरळीमधील वृत्तपत्र विक्रेता संघाचे 200 आणि तेलगू समाजाच्या 300 महिलांचा समावेश होता. तसेच अहिल्यानगर मधील प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख अभिजित पोटे, उबाठा उपजिल्हाप्रमुख आशिक दहीफळे, संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, शेवगावचे राष्ट्रवादीचे शहर प्रमुख अमर पुरनाळे यांचा समावेश होता.

तर सोलापूरचे उबाठा गटाचे माजी संपर्कप्रमुख संजय कोकाटे, जिल्हा समन्वयक सचिन सोनटक्के, मंगळवेढा तालुका संघटक मारुती वाघमारे, सांगली जिल्ह्याचे उबाठाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, मनसेचे माजी जिल्हाप्रमुख वैभव कुलकर्णी, जिल्हा संघटक बजरंग पाटील, पुणे जिल्ह्यातील उबाठा उप शहरप्रमुख नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज बाळासाहेब मालुसरे, वडगाव शेरीचे आनंद गोयल, लातूरच्या दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनंत दोरवे आणि माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि सरपंच यांचा समावेश होता.

यावेळी बोलताना, गेल्या अडीच वर्षात पायाभूत सुविधा आणि लोककल्याणकारी योजना यांची सांगड घालून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी शिवसेनेने काम केले असून, त्यामुळेच नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत पक्षाला दैदिप्यमान असे यश मिळाले आहे. तर दुसरीकडे माझ्यावर दिवसरात्र फक्त टीका करणाऱ्यांना मात्र जनतेने साफ नाकारून कायमचे घरी बसवले आहे. शिवसेनेने आजवर केलेल्या कामावर विश्वास ठेवून आज आपण सारे पक्षात प्रवेश करत आहात, मात्र आपल्या विभागातील जनतेचे प्रलंबित प्रश्न नक्की मार्गी लावले जातील अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी या साऱ्यांना दिली. तसेच यापुढे पक्षवाढीसाठी कार्यरत राहण्यास सांगितले.

तसेच मुंबईतील वृत्तपत्र विक्रेता संघांच्या सदस्यांनी आज पक्षप्रवेश केला असून पक्षाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न केले जातील असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.

ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशावेळी शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, सचिव संजय मोरे, सचिव संजय म्हशीलकर, उपनेत्या आशा मामेडी, वरळीचे विभागप्रमुख दत्ता नरवणकर, प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, माजी नगरसेवक पांडुरंग पाटील, प्रवक्ते संजीव भोर पाटील आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

आयुष्यात कधीही भाजपसोबत जाणार नाही” – महादेव जानकरांचा स्पष्ट इशारा

“परभणी जिल्ह्यात काँग्रेस पुन्हा भक्कमपणे उभी करा” – हर्षवर्धन सपकाळ यांचा कार्यकर्त्यांना संदेश

सात्यकी सावरकरांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करा!

काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोफत नोटबुकचे प्रकाशन; विद्यार्थ्यांना वाटपाचा सामाजिक उपक्रम

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रवि राणांच्या पाठपुराव्याला यश, आकोली वळण रस्ता पूर्ण होणार, १६० कोटी रुपये खर्चाचा पर्यायी मार्ग मिळणार
Next Article बेलोरा विमानतळाचा …न भूतो न भविष्यति होणार उद्घाटन सोहळा, पंतप्रधान येण्याची शक्यता

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?