Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रात्री मुंबईत, आज केरळमध्ये; मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

रात्री मुंबईत, आज केरळमध्ये; मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त

Surajya Digital
Last updated: 2021/02/26 at 10:50 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

तिरुवनन्तपूरम / मुंबई : काल रात्री मुंबईत स्फोटके सापडल्याने खळबळ उडालेली आहे. आता केरळमध्ये आज शुक्रवारी सकाळी कोझिकोड रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर स्फोटके सापडली आहेत. चेन्नई-मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये ११७ जिलेटीन स्टिक आणि ३५० डिटोनेटर सापडले. चेन्नईतील एका महिलेच्या सीट खाली स्फोटकांचा साठा सापडला आहे. मात्र, ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेनेच ही स्फोटके आणली होती का? हे स्पष्ट झालेले नाही.

मुंबईत काल रात्री स्फोटकं सापडल्याच्या घटनेला २४ तासही होत नाहीत तोपर्यंत आता आणखी एका राज्यात स्फोटके सापडली आहेत. केरळमध्ये आज सकाळी कोझिकोड रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर स्फोटक सापडली आहेत. कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये ११७ जिलेटिन स्टिक आणि ३५० डिटोनेटर सापडले आहे.

* महिलेकडून साठा जप्त

चेन्नईतील एका महिलेकडूनही स्फोटकं ताब्यात घेण्यात आली असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या सीट खाली स्फोटकांचा साठा सापडला आहे. ही महिला चेन्नईहून थालास्सेरीकडे जात होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मात्र, ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेनेच ही स्फोटकं आणली होती का? याबाबतच्या वृत्ताला कुणीही दुजोरा दिलेला नाही. ही स्फोटकं या महिलेने आणली की इतर कुणी तिच्या सीट खाली ठेवली याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलीस या महिलेची कसून चौकशी करत आहे. चौकशीअंतीच पोलिसांकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात येणार आहे.

* गुन्हे शाखेचे ८ ते १० पथके तैनात

मुंबईत काल मुकेश अंबनी यांच्या मुंबईतील बंगल्यासमोर एक अनोळखी कार संशयास्पदरित्या पार्क करण्यात आली होती. ही बाब समोर आल्यानंतर यथे बॉम्ब स्कॉड पथक, एसएसजी कमांडो तसेच मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटीलही घटनास्थळी दाखल झाले होते. बॉम्ब नाशक पथकाने या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये २० जिलेटीनच्या कांड्या तसेच एक निनावी पत्रही आढळले होते. या पत्रामध्ये ‘ही फक्त झलक आहे’ अशा आशयाचा मजकूर लिहलेला असल्याचे समोर आले होते. त्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण मुंबई काही काळासाठी धास्तावली होती.

दुसरीकडे अंबांनींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस कसून कामाला लागले आहेत. याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडे आहे. गुन्हे शाखेकडून या लोकांना शोधण्यासाठी ८ ते १० पथके तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याची पाहणी सुरु आहे. मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही नाकांबदी करुन वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. याशिवाय, अनेक हॉटेल्स, ढाबा आणि लाँजमध्ये जाऊन पोलिसांची पथके चौकशी करत आहेत.

You Might Also Like

गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी

युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा

युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा

अंतराळ स्थानकाहून शुक्लांचा हिंदी भाषेतून संदेश

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल

TAGGED: #AtnightinMumbai #todayKerala #Largequantities #ammunition #seized, #रात्रीमुंबईत #आजकेरळमध्ये #मोठ्याप्रमाणात #स्फोटके #जप्त
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राहुल गांधींनी समुद्रात उडी घेत अनुभवले मच्छिमाऱ्यांचे जीवन
Next Article मोदी सरकारचा कोर्टात समलैंगिक लग्नास मान्यता देण्यास विरोध, मूलभूत अधिकार नाही

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?