Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात तब्बल ५०० एकर जागेत भव्य उद्यान उभारण्यासाठी मान्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरात तब्बल ५०० एकर जागेत भव्य उद्यान उभारण्यासाठी मान्यता

Surajya Digital
Last updated: 2023/04/26 at 7:06 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

○ वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सोलापुरात घोषणा

 

सोलापूर : सोलापूर शहरातील वनविभागाच्या तब्बल ५०० एकर जागेवर भव्य वन उद्यान उभारण्यासाठी मान्यता दिल्याची माहिती राज्याचे वन व सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज बुधवारी (ता. २६) सोलापुरात पत्रकार परिषदेत दिली. Forest Minister Culture Minister Sudhir Mungantiwar announced the approval to build a grand park in Solapur in an area of ​​500 acres

 

कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने कर्नाटकात जाण्यासाठी मंत्री मुनगुंटीवार सोलापुरात आले होते. त्यादरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार सुभाष देशमुख यांनी ही मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने या उद्यानास मान्यता दिली असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सोलापूर शहरात शुद्ध हवा देणारे केंद्र व्हावे याकरिता वन उद्यानाबाबत उद्या (गुरुवारी) बैठक होणार आहे. या वन उद्यानाबाबतच्या सूचना नागरिकांनी आ. सुभाष देशमुख यांच्या कार्यालयात किंवा वन खात्याच्या कार्यालयात आणून द्याव्यात. त्यांची योग्य दखल घेतली जाईल असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, पुणे विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे आदी उपस्थित होते.

 

○ श्री सदस्यांच्या मृत्यूचे राजकारण दुर्दैवी

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात झालेला श्री सदस्यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. परंतु सत्तेची भूक असलेल्या विरोधकांकडून श्री सदस्यांच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा भव्य दिव्य झाल्याने काही जणांना त्रास होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी देखील उन्हातच बसलेल्या होत्या. सत्तेची लालसा असणाऱ्या काही जणांनी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या खोट्या सहीचे खोटे पत्र चांद्यापासून बांद्यापर्यंत व्हायरल केले. याचा सूत्रधार शोधून काढण्याची विनंती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येणार आहे. रात्रीचा प्रवास करणे श्री सदस्यांसाठी अवघड असल्याने दिवसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचेही मुनगंटीवार यांनी एका प्रश्नास उत्तर देताना सांगितले.

○ मराठा आरक्षणाबाबत शासन सकारात्मक

मराठा समाजाला आरक्षण मिळणे बाबत शासन सकारात्मक आणि गंभीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा मराठा आरक्षणाची मागणी झाली नाही. गेल्या अडीच वर्षात देखील मराठा मोर्चे झाले नाहीत. कारण मराठा समाजाचा भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारच्या कार्य कुशलतेवर विश्वास आहे. भाजप शिवसेनेचे सरकार हे काम सकारात्मकपणे करेल असा विश्वास मराठा समाजाला आहे. त्यामुळे मराठा समाज आरक्षणाची हक्काने मागणी करत आहे, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

 

○ पंढरपुरातील संकीर्तन सभागृहासाठी २० कोटी रुपयांचा मिळणार पहिला हप्ता

 

पंढरपूर हे आध्यात्मिक ऊर्जा देणारे शहर आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना पंढरपुरात संकीर्तन सभागृहासाठी ६५ कोटी रुपयांना मंजुरी दिली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने हे काम थांबवले. तसेच निधी देखील उपलब्ध करून दिला नाही. आता या संकीर्तन सभागृहासाठी ४० कोटी रुपयांची मान्यता देऊन यातील २० कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केले असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #ForestMinister #CultureMinister #SudhirMungantiwar #announced #approval #build #grandpark #Solapur #areaof500acres, #सोलापूर #तब्बल #५००एकर #जागा #भव्यउद्यान #उभारण्यासाठी #मान्यता #वनमंत्री #सांस्कृतिकमंत्री #सुधीरमुनगंटीवार #घोषणा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महावितरणने महापालिकेवर खापर फोडण्यापेक्षा वस्तुस्थिती पहावी : महापालिका आयुक्त 
Next Article मुख्यमंत्री शिंदे शेतात रमले, महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्याचे केले आवाहन

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?