सोलापूर, 24 जुलै — सोलापूर महापालिकेने शहरातील 96 बेकायदा बांधकामांची यादी जाहीर केली असून, या यादीत अनेक नामवंत बिल्डर्स, प्रतिष्ठित नागरिक, राजकारणी आणि समाजसेवकांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांत या प्रकरणांवर सुनावण्या झाल्या असून, त्यातील 28 बांधकामे पाडण्याचे आदेश निश्चित झाले आहेत.
कुठल्या भागांमध्ये बेकायदा बांधकामे?
बेकायदा बांधकामे खालील भागांमध्ये आढळली आहेत:
-
पाच्छा पेठ, गणेश पेठ, मजरेवाडी, लक्ष्मी पेठ,
-
उत्तर कसबा, भवानी पेठ, साखरपेठ, नेहरूनगर,
-
शुक्रवार पेठ, विजापूर रोड, सलगरवाडी, रेल्वे लाईन,
-
पूर्व मंगळवार पेठ, जोडभावी पेठ, दक्षिण सदर बाजार,
-
तेलंगी पाच्छा पेठ, सिद्धेश्वर पेठ, बेगमपेठ.
कोणत्या प्रतिष्ठित बांधकामांची नावं यादीत?
महापालिकेच्या कारवाईच्या कक्षेत आलेली काही महत्त्वाची प्रकरणे:
-
प्रशांत भीमाशंकर दर्गो पाटील (उत्तर कसबा)
-
शहाणे बिल्डर (पाच्छा पेठ)
-
आदर्श सहकारी बिल्डिंग (उत्तर सदर बाजार)
-
दर्शना कन्स्ट्रक्शन व राजेश चंद्रकांत शहा (रेल्वे लाईन)
-
गुरुनानक सिंधी को-ऑप. हाउसिंग सोसायटी, मोहन सचदेव (सिव्हिल लाईन)
-
निशा प्रकाश भोसले (नेहरूनगर)
-
साई विश्व बिल्डर्स – लक्ष्मीनारायण दुस्सा (उत्तर कसबा)
-
स्क्वेअर इन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, स्क्वेअर वन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स
-
कल्पना नितीन आपटे, रूपाली विजय आपटे, मल्लिनाथ विश्वास दर्गो पाटील
-
गजराज नगर – नासिर खलिफा (स्क्वेअर बिल्डर्स)
काय उल्लंघन झाले आहे?
या बांधकामांमध्ये बांधकाम नियमांचे उल्लंघन, सामासिक अंतर (setback) न पाळणे, तसेच महापालिकेच्या नोटीसांची अवहेलना झाली आहे. त्यामुळे आता या मिळकतधारकांविरुद्ध थेट पाडकामाची कारवाई होण्याची शक्यता आहे.
कारवाईकडे सोलापूरकरांचे लक्ष
सोलापूर महापालिका आयुक्तांकडून लवकरच या बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई सुरू होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे शहरातील अन्य बेकायदा बांधकामे थांबवण्याचा इशारा देण्यात आला आहे.