Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुणे मनपा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आम आदमी पार्टी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

पुणे मनपा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आम आदमी पार्टी

Surajya Digital
Last updated: 2021/09/04 at 9:48 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : आम आदमी पक्षाने पुणे महानगरपालिकेबाबत मोठी घोषणा केली आहे. आप पुणे मनपा निवडणुकीत सर्व जागा लढवणार आहे. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेसह आता आपही निवडणूक रिंगणात दिसणार आहे. त्यामुळे पुण्यातील निवडणुकीची आणखीच वाढणार आहे. आपच्या राज्य समितीने पुण्यात पत्रकार परिषद घेत पुण्यातील कॅन्टोन्मेंटसह मनपाच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली.

आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले, “आप हा स्वच्छ प्रतिमेचा पक्ष आहे. महाराष्ट्रातील आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अश्या स्थितीत आप सारखा राजकीय पर्यायच ही परिस्थिती सुधारू शकतो.” “दिल्लीतील विकास कामे आणि प्रस्थापित राजकीय पक्षांकडून होत असलेली जनतेची फसवणूक यामुळे आप हा पर्याय जनता स्वीकारेल,” असं मत आपचे सह संयोजक किशोर मंध्यान यांनी व्यक्त केलं.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

आपचे राज्य अध्यक्ष रंगा राचुरे म्हणाले, “गेले काही दिवस आप राज्यसमिती विविध शहरांना भेटी देत असून कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहे. शहरी तोंडावळा असूनही आम्हाला ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. आता पुण्यासारख्या शहरात चांगला प्रतिसाद जनतेकडून मिळेल.”

पुण्यात महसूल विभागापाठोपाठ महानगरपालिकेत लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने टक्केवारी आणि भ्रष्टाचारबाबत नवा टप्पा गाठला आहे. या ‘भाजप राष्ट्रवादी भाऊ भाऊ , सर्व वाटून खाऊ’ या धोरणाचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे आता आपची ही निवडणूक पुणेकर जनताच लढवेल, असा आशावाद व्यक्त केला.

पत्रकार परिषदेस पुणे शहर अध्यक्ष मुकुंद किर्दत , संघटन मंत्री डॉ. अभिजित मोरे, सह संयोजक संदीप सोनावणे, संदेश दिवेकर, विद्यानंद नायक यांची उपस्थिती होती.

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

TAGGED: #AAP #contest #seats #Pune #MunicipalCorporation #elections, #पुणे #मनपा #निवडणुकीत #सर्वजागा #लढवणार #आमआदमीपार्टी #आप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात प्रत्येक शाळेत आता हेल्थ क्लिनिक !
Next Article आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन; राजू शेट्टींचा इशारा

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?