Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बड्या थकबाकीदारांवर महापालिकेची धडक वसुली मोहीम; पहिल्याच दिवशी तीन शिक्षण संस्थांची कार्यालये सील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

बड्या थकबाकीदारांवर महापालिकेची धडक वसुली मोहीम; पहिल्याच दिवशी तीन शिक्षण संस्थांची कार्यालये सील

Surajya Digital
Last updated: 2022/12/09 at 4:58 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
☆सिंहगड, इंदिरा अभियांत्रिकी कॉलेजवर कारवाई☆ एका दिवसात सुमारे दोन कोटी रुपयांची□ या शिक्षण संस्थांवर सील कारवाई□ या मिळकतदारांकडून सव्वा कोटींची वसुली□ अन्यथा थकबाकी असलेल्या शिक्षण संस्थांवर कठोर कारवाई : पोळ

☆सिंहगड, इंदिरा अभियांत्रिकी कॉलेजवर कारवाई

☆ एका दिवसात सुमारे दोन कोटी रुपयांची

 

सोलापूर : सोलापूर महापालिका कर संकलन विभागाच्या माध्यमातून पाच पथकाने बेधडक कारवाई करत शहरातील मिळकतकराचे बडे थकबाकीदार असलेल्या तीन शिक्षण संस्थांची कार्यालये सील करण्यात आली आहेत तर गुरुवारी (ता. 8) एकाच दिवशी नोटिसा दिलेल्या थकबाकीदारांकडून एक कोटी २१ लाख रुपये तर इतर थकबाकीदारांकडून ६७ लाख अशी सुमारे दोन कोटीची वसुली करण्यात आली आहे. Municipal Corporation’s strike recovery campaign on heavy arrears; On the first day, the offices of three educational institutions were sealed in Solapur

 

सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांच्या आदेशानुसार बड्या थकबाकीदारांवर महापालिकेच्या  वतीने जप्तीची व सील कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान यापूर्वी सप्टेंबर मध्ये नोटिसा देऊनही तीन लाखावरील मिळकत कर थकबाकीदारांनी थकबाकी भरण्यास प्रतिसाद दिला नाही, थकबाकीदारांविरुध्द गुरुवारपासून जप्ती व सील करण्याची कारवाई सुरू आहे.

बड्या थकबाकीदारांवर सील कारवाई करण्यासाठी एकूण पाच पथके तैनात करण्यात आले आहेत. या पथकाने गुरुवारी बारा ठिकाणाहून ही वसुली केली आहे. या पाच पथकांमध्ये २५ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता कर संकलन विभाग प्रमुख युवराज गाडेकर यांच्यासह पाच पथकाने ही कारवाईची मोहीम राबविली.

 

□ या शिक्षण संस्थांवर सील कारवाई

 

पहिल्याच दिवशी वसुली महापालिकेच्या वसुली पथकाकडून सावित्रीबाई शिक्षण प्रसारक मंडळ, सिंहगड कॉलेज, केगाव, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण मंडळ, एस. एस नवले, बाळे आणि भारतरत्न इंदिरा कॉलेज या शिक्षण संस्थांची कार्यालय, संगणक कक्ष सील करण्यात आली आहेत अशी माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

 

□ या मिळकतदारांकडून सव्वा कोटींची वसुली

थकबाकी असलेल्या नोटीस बजावण्यात आलेल्या मिळकतदारांकडून सुमारे सव्वा कोटी रुपये कर वसुली पथकाने केली आहे. यामध्ये सोनाशंकर ज्ञान विकास ट्रस्ट, मुरारजी पेठ- ४५ लाख रुपये, मोगलय्या स्वामी/ जवळेकर, ओम डेव्हलपर्स – ११ लाख ३७ हजार ८०२ रुपये, यशोधरा हॉस्पिटल, सिध्देश्वर पेठ – २० लाख २८ हजार ७०४ रुपये, भद्रावती यंत्रमाग संस्था, एमआयडीसी ३ लाख ८९ हजार ७१६ रुपये, सत्यविजय – मंगल कार्यालय, एमआयडीसी ९ लाख ३५ हजार २५७ रुपये, बी. एस. कामुनी, पाच्छा पेठ ४ लाख ५३ – – हजार ३५३ रुपये, आर. डी. सारडा पाच्छा पेठ, ४ लाख ४३ हजार ५६७ रुपये, डी.एस. जाधव, पाच्छा पेठ – २ लाख २९ हजार ८९१ रुपये, पुलगम टेक्सटाईल १ लाख १२ हजार ५०४ रुपये, मोगलय्या स्वामी, – सोरेगाव – ११ लाख ८९ हजार १२ रुपये, महाराष्ट्र स्व मिल ३ लाख १३ हजार ७०६ रुपये, कृष्णा स्टोन ४ लाख २ हजार ३५१ रुपये असे एकूण १ कोटी २१ लाख ३५ हजार ८६३ रुपये वसुली करण्यात आले आहे. तर आज इतर मिळकत करापोटी एकूण ६७ लाख रुपये वसुली जमा झाले आहे.

 

□ अन्यथा थकबाकी असलेल्या शिक्षण संस्थांवर कठोर कारवाई : पोळ

येत्या १५ डिसेंबरपर्यंत शासकीय मध्ये ८० टक्के सवलतीची अभावी योजना लागू आहे. त्यानंतर मात्र थकबाकीदारांनी व नोटीस बजावलेल्या बड्या थकबाकीदारावर जप्ती वसुलीची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर थकबाकीदार असलेल्या या शिक्षण संस्थांच्या अंतर्गत शाळा व कॉलेज ही सील करण्याची कारवाई नाईलाजास्तव हाती घ्यावी लागेल.

कोविडच्या काळात ही काही शिक्षण संस्थांनी विद्यार्थी व पालकांकडून फीच वसुली केली होती. नियमितपणे शिक्षण संस्था फी घेतात तर दुसरीकडे महापालिकेचा मिळकत कर भरला जात नाही. शिक्षण संस्थांनी कर हा भरला पाहिजे कोणताही त्रास देण्याचा महापालिका प्रशासनाचा उद्देश नाही, असे उपायुक्त विद्या पोळ यांनी सांगितले.

 

 

 

You Might Also Like

26/11 च्या वेळी केलेली मागणी आता भारताची अधिकृत भूमिका : फडणवीस

सोलापूरात गुटखा मिळतोय सर्रास दुकाने-टपर्‍यांवर

दगडूशेठ गणपतीसमोर ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य

संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन

चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस

TAGGED: #Municipal #Corporation's #strike #recovery #campaign #heavyarrears #firstday #offices #three #educational #institutions #sealed #Solapur, #बड्या #थकबाकीदार #सोलापूर #महापालिका #धडक #वसुलीमोहीम #पहिल्याचदिवशी #तीन #शिक्षणसंस्था #कार्यालय #सील
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोमवारी अठरावा दीक्षांत समारंभ
Next Article सोलापूर । दुचाकीला क्रूझरची धडक; कॉलेजयीन युवकाचा जागीच मृत्यू, घोडा तांडा येथील घटना

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?