Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विदारकपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

विदारकपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2020/07/26 at 8:09 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील  शिराळ येथील एका व्यक्तीचा अत्यंत क्रुरपणे खून करुन मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार शेवरे (ता.माढा) येथील टेंभर्णी-अकलूज रोडजवळील  उजनी  डावा उजवा कालव्याच्या साईटपट्टीला रविवारी सकाळी  उघडकीस आला. टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

संजय मारुती काळे (वय ५४, रा. शिराळ ता. माढा) असे मृत झालेल्याचे नाव आहे.  हे खारी, टोस्ट बेकरीचा व्यवसाय करत होते. मिळालेल्या माहितीनुसार संजय काळे हे काल शनिवारी सायंकाळी जेवण करून घराबाहेरील आपल्या अंगणात झोपले होते. शनिवार मध्यरात्री ते रविवार पहाटेच्या दरम्यान ते आपला  छोटाहत्ती (एम एच ४५-६५७७ ) मालवाहतूक वाहन घेऊन, घरी कोणालाही न सांगता घराबाहेर पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज रविवारी सकाळी सात वाजता शेवरे (ता. माढा) येथे उजनी कालव्याचा उजव्या बाजूचा रस्त्या लगत टेंभुर्णी – अकलूज रोड पासून आतमध्ये अंदाजे सहाशे फुट अंतरावर शेवरे येथील जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना छोटा हत्ती वाहन पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसून आले. काही नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. शरीराचे छातीपासून थोडा वरचा भाग शीर व एक हात शाबूत होता. बाकी शरीर पूर्णपणे जळून खाक झाले होते. चेहऱ्यावर धारदार शस्ञाने वार केलेल्या खूना डाव्या बाजूचा कान तुटल्यासह जखमा दिसून आल्या.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

अकलूज-टेंभुर्णी रस्त्याच्या पूर्वेस उजनी कॅनॉलच्या भराव्याखाली छातीच्या खालचा भाग जळालेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. या ठिकाणी टेम्पो ही पलटी केलेला होता. दरम्यान, मारेकऱ्यांनी त्यास ठार करून टेम्पोची स्टेफनी अंगावर टाकत मृतदेह पेटवून दिला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेत तो टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. तेथे शिराळ ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. खुन कोणत्या कारणावरुन झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

मृत काळे यांचा किरकोळ सावकारकीचाही व्यवसाय असल्याचे येथील नागरिकांतून चर्चा आहे तर असा इतका निर्दयपणे खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह टमटमसह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करून आरोपींनी टेंभुर्णी पोलीसांसमोर अवाहन उभे केले आहे.

* मृतदेहाची विदारक स्थिती

मारेक-यांनी मयत संजय काळे याचा खून इतका क्रुरपणे केला आहे की, त्याचे फक्त एक हात आणि चेहराच फक्त ओळखता येत होता. चेह-यावर तीन वार करण्यात आले आहेत. यामध्ये त्याचा एक कान तुटला आहे. तर एक हात मिळून आला नाही तर तोंड धडापासून वेगळे झाले आहे. धडापासून खालचा भाग पूर्ण जळून खाक झाला आहे. हा खून अनैतिक संबधातून झाला असल्याचा संशयही व्यक्त आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #खून #टमटम #टेंभुर्णी #विदारक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूरसह चार तालुक्यातील लॉकडाऊन मध्यराञीपासून उठणार; माञ बार्शी तालुक्यात लॉकडाऊन वाढला
Next Article सोलापूर शहरात कोरोनाचे 162 रुग्ण वाढले तर 3 कोरोना बळी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?