Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गुंजेगावात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; पतीला अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

गुंजेगावात चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; पतीला अटक

Surajya Digital
Last updated: 2021/09/25 at 8:13 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

भंडारकवठे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने जोरदारपणे मारहाण करून तिला जीवे ठार मारल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे आज शनिवारी दुपारी सव्वाबारा वाजता घडली आहे. त्याने हे सर्व रागाच्या भरात केले पण अपराध केल्याचे लक्षात येताच तो सावध झाला. त्यानेच मेहूण्याला फोन करुन आपल्या हातून घात झाल्याचे सांगितले.

मनीषा सिद्धू हराळे (वय ३६) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मयत मनीषा हिचा विवाह २००४ साली हराळवाडी ( ता. मोहोळ) येथील सिध्दू  किसन हराळे यांच्याबरोबर झाला होता. सिद्धू हराळे यांची शेती गुंजेगाव येथे असल्याने ते आपल्या दोन मुली आणि एक मुलगा व पत्नीसह  येथील बंडगर वस्ती गुंजेगाव येथे राहत होते.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सिद्धू हराळे हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. तू दुस-याच्या शेतात कामास का जाते म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून मनिषाला दमदाटी व शिवीगाळ करीत होता. आज शनिवारी दुपारी सव्वा बारा ते साडेबारा दरम्यान भांडण काढून तिच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. यात ती गंभीर जखमी होऊन  हिचा जागेवरच मृत्यु झाला.

त्यानंतर पावणे एक वाजता सिद्धू हराळे यांनी आपल्या मेव्हणा खंडू माने याला फोन करून माझ्या हातून घात झाला आहे,  मी तुझ्या बहिणीला जीवे ठार मारले आहे, असे सांगितले. घटनेची माहिती मिळताच मेव्हणा खंडू माने व त्याचे कुटुंबीय गुंजेगाव येथे घटनास्थळी आले. या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, हवालदार शहानूर मुलाणी, श्रीकांत बुरजे, महेश कोळी आदींनी घटनास्थळी धाव घेतली.  मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनसाठी मंद्रूप ग्रामीण रूग्णालयास पाठविले. पती सिध्दू हराळे याला पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ. नितीन थेटे हे करीत आहेत.

वाघोली येथील शेतकऱ्याचा मुलगा सागर मिसाळ झाला IAS अधिकारी

माळीनगर – वाघोली (ता माळशिरस) येथील श्री भारत जालिंदर मिसाळ या शेतकऱ्याचा मुलगा सागर भारत मिसाळ UPSC च्या परीक्षेत पास होऊन यश संपादन केले आहे.

या पूर्वी २०२० मध्ये सागर भारत मिसाळ यांनी UPSC च्या परीक्षेत यश मिळवून उत्तराखंड या राज्यात IAS पदावर त्यांची निवड झाली होती. जिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न मनी बाळगून सागर मिसाळ यांनी हा दुसरा प्रयत्न केला होता त्यातही यश प्राप्त केले. या यशा बद्दल सागर मिसाळ यांचे सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन करण्यात येत आहे.

सागर मिसाळ हे एक गरीब शेतकरी कुटुंबातील असून थोड्या फार शेतीत आई वडिलांनी कष्ट करून सागर मिसाळ व त्याच्या लहान भावाला शिक्षण दिले. भारत मिसाळ यांचा दुसरा मुलगाही UPSC चा अभ्यास करीत आहे. सागर मिसाळ यांचे प्राथमिक शिक्षण वाघोली (ता माळशिरस) येथील जिल्हा परिषद शाळेत होऊन माध्यमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झाले. कृषी पदवी घेऊन UPSC अभ्यास करीत होते.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Murder #wife #suspicion #character #Gunjegaon #Husband #arrested, #गुंजेगावात #चारित्र्याच्या #संशयावरून #पत्नीचा #खून #पतीला #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article समन्स बजावण्यासाठी गेलेल्या पोलीसास वाळू टेम्पोने जागीच चिरडले
Next Article पोलीस निरीक्षकाने केले गरीब मुलीचे कन्यादान, पोलीस स्टेशनमध्येच पार पाडला लग्नसोहळा

Latest News

‘’ लहान मुलाप्रमाणे चालायला शिकतोय’’; अंतराळातून शुभांशू शुक्लांचा व्हिडिओ कॉल
देश - विदेश June 26, 2025
हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे ६ जुलैला काढणार भव्य मोर्चा
महाराष्ट्र June 26, 2025
राष्ट्रीय औष्णिक विद्युत महामंडळ ‘काम करण्यासाठी सर्वोत्तम संस्था – 2025’ पुरस्काराने सन्मानित!
देश - विदेश June 26, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमध्ये अडकलेले आणखी २७२ नागरिक परतले
देश - विदेश June 26, 2025
मुंबईत ६ जुलैला विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीमय संगीत सोहळा – ‘अवघे गर्जे पंढरपूर’!
महाराष्ट्र June 26, 2025
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून मुंबईत
महाराष्ट्र June 26, 2025
भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंग होणार सरकारी अधिकारी
खेळ June 26, 2025
युद्धविराम होताच इराणने भारताचे मानले जाहीर आभार
देश - विदेश June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?