Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: करमाळ्यात तरुणाला दुचाकीला बांधून फरपटत नेऊन खुनाचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

करमाळ्यात तरुणाला दुचाकीला बांधून फरपटत नेऊन खुनाचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा

Surajya Digital
Last updated: 2022/12/02 at 11:16 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ बाळे येथे पहाटे अपघात; दुचाकी वरील तरुण ठार

सोलापूर – पूर्वीचे भांडण तसेच पैशाच्या वादातून एका तरुणाला दुचाकीला दोरीने बांधून फरफटत नेऊन चाकूने मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केल्याची घटना केडगाव  (ता.करमाळा) येथे गुरुवारी (ता. 1) दुपारच्या सुमारास घडली. Attempted murder in Karmala by tying a young man to a bike; A crime against three

या प्रकरणात करमाळ्याच्या पोलिसांनी रेवणनाथ अंकुश मारकड (रा.चिखलठाण ता.करमाळा) याच्यासह तिघा विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अभिजीत दासू करे (वय २० रा.कोंडेज ता. करमाळा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिजीत करे आणि आरोपी मारकड यांच्यात व्यवसायातील पैशाच्या वाद तसेच पूर्वीचे भांडण होते. दुपारी १२ वाजेच्या सुमारास मारकड याने अभिजीतला केडगाव येथील कॅम्प रस्त्यावर बोलवले होते. त्याप्रमाणे आभिजीत घटना स्थळी आला होता.

तेव्हा मारकड याच्यासह तिघांनी याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला दुचाकीला दोरीन बांधून फरपटत उसाच्या शेतात नेले. आणि त्याला चाकूने वार करून गंभीर जखमी करून पसार झाले. अशी नोंद करमाळा पोलिसात झाली. सहाय्यक निरीक्षक जगताप पुढील तपास करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ बाळे येथे पहाटे अपघात; दुचाकी वरील तरुण ठार

 

सोलापूर – गावातील यात्रेसाठी पुण्याहून दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा अनोळखी वाहनाच्या धडकेन अंत झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी (ता.1) पहाटेच्या सुमारास पुणे महामार्गावरील बाळे येथे घडला.

विजय खाजप्पा निलंगे (वय २० रा. नागणसूर ता.अक्कलकोट) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. संजीवकुमार बसलिंगप्पा मुंदीनकेरी (वय३० रा. नागणसूर) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

निलंगे आणि मुंदनकेरी हे दोघे नागणसुरचे राहणारे असून ते पुण्यात एका कंपनीत कामाला होते. नागणसूर येथे गावची यात्रा असल्याने दोघेही दुचाकीवरून काल रात्री पुण्याहून निघाले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास बाळे परिसरातील शिवाजीनगर येथे अनोळखी वाहनाच्या धडकेने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी विजय निलंगे हा उपचारापूर्वी मरण पावला. या अपघाताची नोंद फौजदार चावडी पोलिसात झाली. हवालदार परीट पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

TAGGED: #Attempted #murder #Karmala #bytying #young #man #bike #crime #three, #करमाळा #तरुण #दुचाकी #बांधून #फरपटत #खुनाचा #प्रयत्न #तिघांवर #गुन्हा #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । मालट्रक – रिक्षाच्या धडकेत एक ठार; आठजण जखमी
Next Article दहा वर्षे झाले असेल तर आधारकार्ड अद्ययावत करा अन्यथा लाभ मिळणार नाही

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?