Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : गुप्तांग कापून पसार, रिक्षाचालकाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर : गुप्तांग कापून पसार, रिक्षाचालकाचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2021/11/19 at 8:59 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर – जागेच्या वादातून कर्नाटकातील एका रिक्षाचालकाचे नाट्यमयरित्या अपहरण करून त्याला तीक्ष्ण शस्त्राने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना कळबगाव (ता. अक्कलकोट) येथे गुरुवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आली.

महेबूब सैपनसाब कलबुर्गी (वय ३२ रा.तडवळगा ता. इंडी जि. विजयपूर) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला मुन्ना चांदसाब पटेल (रा. तडवळगा) आणि अन्य दोघांनी मारहाण  केली अशी प्राथमिक नोंद सिव्हिल पोलीसात झाली आहे.

महेबूब कलबुर्गी याला त्याच्याच गावातील मुन्ना पटेल याने इंडि येथे नातेवाईकाचे काम आहे, माझ्यासोबत चल असे म्हणून त्याला दुचाकीवरून बुधवारी सायंकाळच्या सुमारास नेले होते. वाटेत जेवण केल्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास पटेल याच्यासोबत आणखीन दोघा इसमांनी दोन दुचाकीवरून त्याला कळबगाव (ता. अक्कलकोट) येथील निर्जन वस्तीत नेले.

त्या ठिकाणी  त्याला चाकू आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली. आणि त्याचे गुप्तांग कापून पसार झाले. रात्रभर महेबुब रक्ताच्या थारोळ्यात तेथेच निपचित पडून होता.  सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एका तरुणाने त्याला पाहिले. चौकशी करीत त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून हा प्रकार कळविला. त्यानंतर त्याच्या नातेवाइकाने घटनास्थळी येऊन जखमीला अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार केले.

पुढील उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल केले. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* जीप मालकास न्यायालय कोठडी 
अक्कलकोट : अक्कलकोटहून सोलापूरला येणाऱ्या प्रवासी जीपचे टायर फुटून कुंभारीजवळ झालेल्या भीषण अपघातात सहाजण ठार तर दहाषजण जखमी झाले.
सुभाष पुजारी (रा. अक्कलकोट) असे जीप मालकाचे नाव आहे. तर महिंद्रा जीपचा चालक जलिल नझीर बागवान (रा. म्हेत्रेनगर, अक्कलकोट ) शहर याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. यास कारणीभूत ठरलेल्या चालकानंतर आता अटक केलेल्या मालकास अक्कलकोट न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली. ही  माहिती वळसंग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.
या अपघातात ठार झालेले सर्व सहा जण अक्कलकोट तालुक्यातील आहेत.  कटेव्वा यलप्पा बनसोडे  (वय-५५), त्यांचा मुलगा बसवराज यलप्पा बनसोडे ( वय- ४२), भावाचा मुलगा आनंद इरप्पा गायकवाड ( वय- २५) सर्वजण राहणार ब्यागेहळ्ळी ता. अक्कलकोट, तर लक्ष्मण मुरलीधर शिंदे ( वय- ४२) राहणार बणजगोळ, ता.अक्कलकोट ), आनंद युवराज लोणारी ( वय- २८) हसापूर रोड, अक्कलकोट व  सुनीता सुनील महाडकर (वय ४०) राहणार दोड्याळ ता. अक्कलकोट, असे मृताची नावे आहेत.

 

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Solapur #Attempted #murder #kidnapping #rickshaw #puller, #सोलापूर #गुप्तांग #कापून #पसार #रिक्षाचालक #अपहरण #खुन #प्रयत्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article त्रिपुरारीनिमित्त वटवृक्ष स्वामींना फळांची सजावट
Next Article तीनही कृषी कायदे रद्द होणार, शेतकऱ्यांच्या तब्बल 359 दिवसाच्या लढ्याला यश

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?