Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: उपसरपंच निवडीच्या वादातून सांगलीत ग्रामपंचायत सदस्याचा खून
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीमहाराष्ट्र

उपसरपंच निवडीच्या वादातून सांगलीत ग्रामपंचायत सदस्याचा खून

Surajya Digital
Last updated: 2021/03/04 at 11:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सांगली : सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी आमदार सुमन पाटील आणि खासदार संजय पाटील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. ही घटना आज गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. यात ग्रामपंचायत सदस्याचा खून झाला. पांडुरंग जनार्दन काळे खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या मारामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर जखमी झाला आहे. तसेच आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव याठिकाणी उपसरपंच निवडीवरून झालेल्या मारामारीमध्ये एका ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाली आहे. पांडुरंग काळे असे मयत सदस्याचे नाव आहे. तर या मारामारीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्यही गंभीर जखमी झाले आहेत. ज्यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भाजपा गटाच्या कार्यकर्त्यांकडून ही हत्या झाल्याचा आरोप जखमी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी केला आहे.

पांडुरंग काळे यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाला या उपसरपंच निवडीमध्ये पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आपल्या गटातून चार सदस्य फुटले आणि राष्ट्रवादीचा उपसरपंच होणार या रागात भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला आणि ज्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग काळे यांचा मृत्यू झाला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* आमदार सुमन पाटील आणि खासदार संजय पाटील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निवडीवेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला असून यात एका ग्रामपंचायत सदस्यांचा मृत्यू झाला आहे. जनार्दन काळे (वय 57) असे खून झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. तसेच आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील आणि भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उपसरपंच निवडीवरुन हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मारामारीत गणेश पाटील हे आणखी एक सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय आठ ते दहा कार्यकर्तेही जखमी झाले आहेत. घटना घडल्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी गावात जाऊन जमाव पांगवला. सध्या गावात तणावपूर्ण वातावरण असून गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम घटनास्थळी जाऊन घटनेचा तपास करत आहेत.

* ग्रामपंचायती इमारतीसमोर दोन्ही गटाचे समर्थक भिडले

बोरगावमधील नामदेव पाटील यांनी आपला उपसरपंच पदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडीसाठी बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये अकरा पैकी आठ सदस्य खासदार संजय पाटील गटाचे तर तीन सदस्य आमदार सुमन पाटील गटाचे आहेत. यातील खासदार संजय पाटील गटाचे दोन सदस्य फोडून आपला उपसरपंच करण्याची रणनिती आमदार सुमन पाटील गटाने आखली होती. उपसरपंच निवडीचा कार्यक्रम सुरु होताच ग्रामपंचायत सदस्य मतदानासाठी येत असताना ग्रामपंचायतीच्या इमारतीसमोर दोन्ही गटाचे समर्थक एकमेकांना भिडले. काठ्यांच्या सहाय्याने तुंबळ हाणामारी सुरु झाली. हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्दन काळे यांना काठ्यांचा मार बसल्याने गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. दरम्यान या घटनेमुळे बोरगाव गावासह तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

You Might Also Like

शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

TAGGED: #Murder #sangali #upsarpanch, #उपसरपंच #निवडीच्यावादातून #सांगलीत #ग्रामपंचायत #सदस्याचा #खून
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ओटीटीवर पॉर्न दाखवलं जातंय हे चिंताजनक – सुप्रीम कोर्ट
Next Article ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण नाही

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?