Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ट्रम्प यांच्या ‘बिग ब्यूटीफुल’ विधेयकावर मस्क यांची पुन्हा एकदा जहरी टीका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ट्रम्प यांच्या ‘बिग ब्यूटीफुल’ विधेयकावर मस्क यांची पुन्हा एकदा जहरी टीका

admin
Last updated: 2025/06/30 at 3:16 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वॉशिंगटन , 30 जून (हिं.स.)।उद्योगपती इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांवर उघडपणे टीका केली आहे. ट्रम्प प्रशासनाने आणलेला नवीन कर आणि खर्च विधेयक अमेरिकेसाठी वेडेपणाचा आणि विनाशकारी असल्याचे मस्क यांचे म्हणने आहे.या विधेयकामुळे अमेरिकेचे गंभीर नुकसान होईल आणि लाखो नोकऱ्या जातील, असा दावाही त्यांनी केला आहे.

एकेकाळी ट्रम्प यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक असलेले मस्क आता उघडपणे ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका करताना दिसतात. ट्रम्प प्रशासनाने आणलेल्या या नवीन विधेयकात अशा अनेक तरतुदी आहेत, ज्यांचा अमेरिकेच्या सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक रचनेवर खोलवर परिणाम होऊ शकतो. मेडिकेड आणि फूड स्टॅम्प सारख्या सामाजिक कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च कपात, अमेरिका-मेक्सिको सीमा भिंत वाढवण्यासाठी $46 अब्ज, 1 लाख स्थलांतरित बंदीसाठी $45 अब्ज, 10,000 नवीन ICE अधिकाऱ्यांची भरती, ज्यांच्यासाठी $10,000 चा बोनस, $350 अब्ज सीमा आणि राष्ट्रीय सुरक्षा योजनेचा एक भाग इत्यादींचा यात समावेश आहे. यावरुन मस्क सातत्याने टीका करत आहेत.

इलॉन मस्क यांचा असा दावा आहे की, हे विधेयक अमेरिकेच्या भविष्यातील तंत्रज्ञान आणि उद्योगांसाठी घातक ठरू शकते. हे विधेयक भविष्यातील उद्योगांना हानी पोहोचवून जुन्या उद्योगांना सवलती देते. याद्वारे त्यांनी सूचित केले की, हे विधेयक तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या वेगाने वाढणाऱ्या उद्योगांच्या विकासात अडथळा ठरू शकते.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन खासदारांना ४ जुलैपूर्वी सिनेट आणि सभागृहात हे विधेयक मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही सभागृहांमध्ये रिपब्लिकन पक्षांला बहुमत असल्याने, विधेयक मंजूर होण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी या विधेयकाचे वर्णन त्यांच्या ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा एक भाग म्हणून केले आहे, ज्यामध्ये देशाच्या सीमा मजबूत करणे, बेकायदेशीर स्थलांतरितांना हटवणे आणि सुरक्षेवर खर्च वाढवणे ही मुख्य उद्दिष्टे आहेत.

ट्रम्प यांनी यामध्ये दरवर्षी १० लाख स्थलांतरितांना अमेरिकेतून हाकलून लावण्याचा मुद्दा मांडला आहे. अमेरिकन इतिहासातील ही सर्वात मोठी हद्दपारी मोहीम असेल. तथापि, या योजनेवर टीकाही होत आहे. मस्कप्रमाणेच अनेक उद्योगपती, मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही रिपब्लिकन खासदारांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे.

You Might Also Like

पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article इराणच्या शिया धर्मगुरूंकडून ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्याविरुद्ध फतवा जारी
Next Article अपूर्व हिरे बुधवारी भाजपामध्ये करणार प्रवेश

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?