वॉशिंगटन , 1 जुलै (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्यात पुन्हा एकदा वाद सुरु झाला आहे. मस्क यांनी पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल धोरणाविरोधात तीव्र टीका केली आहे.मस्क यांनी ट्रम्प यांच्या या विधेयतकाला विध्वंसक आणि सामान्य नागरिकांवरील ओझे म्हणून संबोधले आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, हे बिल मंजूर झाल्यास अमेरिकेत मोठे आर्थिक संकट निर्माण होईल. याशिवाय त्यांनी असेही म्हटले आहे की, ट्रम्प रिपब्लिकन पक्षाने हे विधेयक मंजूर केल्यास, ते दुसऱ्या दिवशी नवीन पक्ष स्थापन करतील.
एलॉन मस्क यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले आहे की, या विधेयकामुळे कर्ज मर्यादा ५ डॉलर पर्यंत वाढली आहे, यामुळे आता स्पष्ट होत आहे की देशात नवीन पक्षाच्या स्थापने वेळ आली आहे. मस्क यांनी रिपल्बिकन नेत्यांवर, तीव्र हल्ला केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, रिपब्लिकन नेत्यांनी सरकारी खर्च कमी करण्याच्या नावाखाली निवडून आले आहेत. अशा वेळी कर्जाची मर्यादा वाढवणाऱ्या विधेयकाला मतदान करत आहेत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. असा गंभीर आरोप मस्क यांनी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांवर केला आहे. एलॉन मस्क यांच्या नवीन पक्ष स्थापन करण्याच्या निर्णयाला काही नेत्यांनी समर्थन केले आहे. पण यामुळे हा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यामुळे आता ट्रम्पच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ट्रम्प यांचे हे विधेयक त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मुख्य आणि अमेरिका फस्ट धोरणासाठी असल्याचे म्हटले जात आहे. या विधेयकात संरक्षण, उर्जा आणि सीमा सुरक्षेसाठी अर्थसंकल्पाची मागणी करण्यात आली आहे. मात्र पोषण आणि आरोग्य क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. या विधेयकामुळे राष्ट्रीय तुट वाढण्याची शक्यता असल्याचे मस्क यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, एकेकाळी एलॉन मस्क ट्रम्प यांच्या जवळचे मानले जात होते. २०२४ च्या निवडणुकीत मस्क यांनी मोठ्या प्रमाणात ट्रम्प यांना निधी देऊ केला होता. राष्ट्राध्यक्ष झाल्यानतंर मस्क यांनी सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुखही ट्रम्प यांनी बनवले. परंतु ट्रम्प यांच्या वन बिग ब्युटीफुल धोरणाविरोधात मस्क यांनी टीका केली आणि दोघांमध्ये वाद सुरु झाला.