Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नागपूर : बुलडोजर कारवाईवर हायकोर्टाची नाराजी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

नागपूर : बुलडोजर कारवाईवर हायकोर्टाची नाराजी

admin
Last updated: 2025/03/24 at 8:17 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

गंदलखोरांच्या अतिक्रमणावर चालला बुलडोजरहायकोर्टाची महापालिकेच्या कारवाईवर स्थगिती

नागपूर, 24 मार्च (हिं.स.) : नागपुरातील दंगलीचा सूत्रधार फहीम खान शमीम खान व आरोपी युनूस अब्दुल हाफिज यांच्या घरावरील बुलडोझर कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज, सोमवारी स्थगिती दिली. या कारवाईमुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे सांगत उच्च न्यायालयातील न्या. नितीन सांबरे आणि न्या. वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने बुलडोजर कारवाईवर नाराजी व्यक्त केली.

नागपूर हिंसेतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर सोमवारी सकाळी महापालिकेने बुलडोझरने कारवाई केली. महापालिकेने शुक्रवारी फहीम खानला नोटीस दिली होती आणि सोमवारी अतिक्रमणाची कारवाई केली. यानंतर फहीम खानच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने या प्रकरणात झालेल्या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. बुलडोझर कारवाई ही भेदभावपूर्वक आहे. लक्ष्य करण्याच्या हेतूने ही कारवाई झाली आहे, असे प्राथमिक निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. न्यायालयाने याप्रकरणी पुढील कारवाईवर स्थगिती देण्याचे आदेशही दिले.

याशिवाय राज्याचे मुख्य सचिव यांना सर्वोच्च आदेशाच्या अवहेलना प्रकरणात जबाब नोंदविण्याचे निर्देश दिले. नागपूर महापालिकेने सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमाराला बुलडोजर कारवाई सुरू केली. यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीतील संजय बाग कॉलनी येथील दोन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम पडण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिकेने काल त्याच्या घरावर अनधिकृत बांधकाम काढून घेण्याची नोटीस बजावली होती. चोवीस तासांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आज, सोमवारी सकाळी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक संजय बाग कॉलनीत धडकले. वीज वितरण कंपनीने वीज जोडणी तोडण्यात आली.

एखादी व्यक्ती गुन्ह्यातील आरोपी आहे म्हणून त्या व्यक्तीच्या मालमत्तेवर बुलडोझरने पाडकाम करणं हे घटनाविरोधी असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राजस्थान व मध्य प्रदेशमधील अशा प्रकारच्या कारवायांविरोधात दाखल याचिकांवर सविस्तर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल दिला होता. मात्र सोमवारी सकाळी नागपूर हिंसेतील मुख्य आरोपी फहीम खान यांच्या घरावर बुलडोझरने कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली. अशी कारवाई घटनाविरोधी ठरवतानाच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्याला त्यासाठी दोषी धरले जावे, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले होते.

You Might Also Like

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर : फताटेवाडी ग्रामपंचायतीत अपहार; सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल
Next Article नि:पक्ष, वस्तुनिष्ठ व पारदर्शी पत्रकारिता हा लोकशाहीचा गाभा – व्ही. एल माहेश्वरी

Latest News

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा
सोलापूर June 22, 2025
सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान
सोलापूर June 22, 2025
“ट्रम्पची नोबेलसाठी शिफारस यासाठीच केली होती का…?”
देश - विदेश June 22, 2025
कर्नाटक : सोशल मीडियावरील खोट्या बातम्यांना कायद्याने आळा घालणार
देश - विदेश June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?