Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नामांतराचा विषय पेटला, केली या पक्षाच्या नेत्याने महाराष्ट्राच्या नामांतराची मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

नामांतराचा विषय पेटला, केली या पक्षाच्या नेत्याने महाराष्ट्राच्या नामांतराची मागणी

Surajya Digital
Last updated: 2021/01/04 at 2:09 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आली असताना औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. या नामांतराच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आले आहेत.

औरंगाबादच्या नामांतराला काँग्रेसचा विरोध आहे. त्यातच महाविकास आघाडीला बाहेरून पाठिंबा असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करताना नाव बदलायचंच असेल तर महाराष्ट्राचं नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.

औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले की, शहरांची जिल्ह्यांची नावे बदलून काही फायदा नाही. नामांतर करून विकास होत नाही. नामांतर करायचं असेल तर नवे जिल्हे निर्माण करा. त्यांना नाव द्या. औरंगाबाद, अहमदनगर यांची नावे बदलून उपयोग नाही. संभाजी महाराजांचे नाव द्यायचे असेल तर ते रायगड जिल्ह्याला द्या, त्यापेक्षा महाराष्ट्राचे नामांतर करा आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्र असे नाव द्या, असा सल्ला अबू आझमी यांनी दिला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याचा मुद्दा समोर आल्यापासून शिवसेनेची चौफेर कोंडी होत आहे. एकीकडे महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. तर विरोधी पक्ष असलेला भाजपा आणि मनसे नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत.

* संजय राऊतांची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव बदलण्याचे राजकारण करू नये असेही अबू आझमी म्हणाले. दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी अबू आझमी यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी हे समजूतदार नेते आहेत. अबू आझमींचा संभाजीनगरला काही विरोध असेल असं वाटत नाही. त्यांनी राम मंदिरालाही विरोध केला नव्हता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #नामांताराचा #विषय #पेटला #यापक्षाच्या #नेत्याने #महाराष्ट्राच्या #नामांतराची #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मित्र-मित्र निघाले साईंच्या दर्शनासाठी, दर्शन राहुन गेले, अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू
Next Article शेतकरी मागणीला पाठिंबा, कृषी कायद्यांचा रिलायन्स कंपनीला फायदा नाही

Latest News

Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Hitnspin Cazinou – Pentru toți cei căror le îi place să cumpere inteligent
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?