नवी दिल्ली : अखेर काँग्रेसने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेसने यासंदर्भात आज घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याविषयी चर्चा सुरू होती. शेवटी आज हा निर्णय जारी करण्यात आला. पटोले यांनी गुरुवारी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. दरम्यान नाना पटोले यांच्याआधी बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते.
महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारे बदल अखेर हाय कमांडने केले आहेत. विद्यमान कार्यकारिणीतल्या अनेक मोठ्या नावांना आणि मंत्रिपदावरच्या व्यक्तींना फाटा देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदी चर्चेत होतंच. त्याप्रमाणे त्यांना राज्यातले मोठं पद देण्यात आलं आहे. पटोले यांनी अगोदरच विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे.
नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे कार्यकारी अध्यक्ष पक्षाने राज्यात नेमले आहेत आणि 10 उपाध्यक्षपदाचे चेहरे दिले आहेत. विद्यमान कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर, विश्वजित कदम यांना हटवलं आहे. त्याऐवजी चंद्रकांत हांडोरे, प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* अशी आहे काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी
– प्रदेशाध्यक्ष – नाना पटोले
– कार्यकारी अध्यक्ष
1. शिवाजीराव मोघे
2. बसवराज पाटील
3. मोहम्मद अरिफ नसीम खान
4. कुणाल रोहिदास पाटील
5. चंद्रकांत हांडोरे
6. प्रणिती सुशीलकुमार शिंदे
दैनिक सुराज्यने काही दिवसांपूर्वीच आमदार प्रणिती शिंदे यांना कार्याध्यक्ष पद मिळणार असे वृत्त प्रसिद्ध केले होते. ते या निवडीने हे वृत्त खरे ठरले.
– उपाध्यक्ष
1. शिरीष मधुकरराव चौधरी
2. रमेश बागवे
3. हुसेन दलवाई
4. मोहन जोशी
5. रणजित कांबळे
6. कैलास गोरंट्याल
7. बी. जी. नगराळे
8. शरद आहेर
9. एम. एम. शेख
10. माणिक जगताप