नांदेड, 20 ऑगस्ट – नांदेड जिल्ह्यातील पूरस्थितीत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांचा मदत धनादेश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नैसर्गिक आपत्तीमध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांची नावे आणि त्यांचे वारस पुढीलप्रमाणे आहेत –
-
पिराजी म्हैसाजी थोटवे (वय 70) – वारस : मारोती पिराजी थोटवे (मुलगा)
-
चंद्रकला विठ्ठल शिंदे (वय 35) – वारस : विठ्ठल व्यंकटराव शिंदे (पती)
-
ललिताबाई गोविंद भोसले (वय 60) – वारस : जगदीश गोविंद भोसले, मधुकर गोविंद भोसले (मुले)
-
भीमाबाई हिरामण मादाळे (वय 65) – वारस : संग्राम हिरामण मादाळे, राहुल हिरामण मादाळे (मुले)
-
गंगाबाई गंगाराम मादाळे (वय 65) – वारस : लालाबाई व्यंकट मादाळे (मुलगी)
आपत्तीग्रस्त कुटुंबांना दिलेला हा मदत धनादेश शासनाच्या आपत्ती निवारण मदतीचा एक भाग आहे.
