Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राहुल गांधी, उद्धव ठाकरेंना शेतीतल काय कळते, नारायण राणेंचा सवाल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राहुल गांधी, उद्धव ठाकरेंना शेतीतल काय कळते, नारायण राणेंचा सवाल

Surajya Digital
Last updated: 2021/01/07 at 6:36 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

कणकवली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या दोघांनाही शेतीतलं काय कळतं? असं विचारतानाच कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो, हे तरी यांना माहीत आहे का? असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी कणकवलीत केला.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भाजपने सिंधुदुर्गात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गेल्या सत्तर वर्षांमध्ये जे काँग्रेसला जमलं नाही. ते मोदींनी करून दाखवलं. ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही तिच काँग्रेस आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना पिकवलेला माल विकायलाही बंधने होती. तोट्यात माल विकला जायचा. मेहनतीचा पैसाही त्यांना मिळत नव्हता. सत्तर वर्षातील हे नियम मोदींनी मोडून काढले. आज त्यालाच काँग्रेसने विरोध सुरू केला आहे, अशी टीका राणे यांनी केली.

* भाजपच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकते

काँग्रेसने काही दलालांना फूस लावून शेतकरी आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेसने दलालांना कामाला लावलं आहे. हे राजकीय आंदोलन आहे. त्यामुळे त्यात सेटलमेंट होईल असं वाटत नाही, असं राणे म्हणाले. राहुल गांधींना शेतीतलं काय कळतं. ते काय बोलतात हे त्यांना कळतं का? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्यांना शेतीतलं काय कळतं? कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो? हे तरी यांना माहीत आहे का? असा सवालही त्यांनी केला. भाजप शेतकऱ्यांसाठी विधायक कामं करत आहे. भाजपच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो, असंही ते म्हणाले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #राहुलगांधी #उद्धवठाकरेंना #शेतीतल #कायकळते #नारायणराणेंचा #सवाल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विधान परिषद निवडणुकीत झाला गैरप्रकार,ईव्हीएमवर मतदान घ्या, निवडणूक आयोगाकडे धाव
Next Article परळीत भाजप सदस्यांनी केली राष्ट्रवादीला मदत; मुंडे भाऊ-बहिणींमधील कडवटपणा दूर

Latest News

test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?