गांधीनगर : गुजरातचे ज्वेलर वसंत बोहरा यांनी सूरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती बनवली आहे. 156 ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला. ही मूर्ती तयार करण्यासाठी 11 लाख रुपयांच्या सोन्याचा वापर करण्यात आला आहे. Watch Video: Narendra Modi’s Gold Idol; The price of the idol has not been decided yet Saraf Bohra
18 कॅरेट सोन्यापासून बनवलेल्या या मूर्तीची लांबी 4.5 इंच आणि रुंदी 3 इंच आहे. नुकत्याच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने 156 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे या मूर्तीचे वजन 156 ग्रॅम ठेवण्यात आल्याची माहिती बोहरा यांनी दिली. याआधी काही मोदी समर्थकांनी त्यांचे मंदिर बांधल्याचेही समोर आले होते.
https://twitter.com/Manish_Rep/status/1614107163777171458?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1614107163777171458%7Ctwgr%5E4fbd2b3ee67690a50e557de5d0aca9a059ef15f0%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सुरतमधील ज्वेलरी तयार करणाऱ्या राधिका चेन्स कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार केली आहे. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपनं 156 जागांवर विजय मिळवला होता. त्या पार्श्वभूमीवर 156 ग्रॅम वजनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली होती. सध्या ही मूर्ती सोशल मीडियावर सध्या हा चर्चेचा विषय ठरली आहे. लोक दुरुन दुरुन ही मूर्ती बघण्यासाठी त्यांच्या दुकानात गर्दी करत आहे.
याविषयी अधिक बोलताना राजस्थानमधील बोहरा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी चाहता आहे. त्यांना समर्पित करण्यासाठी काहीतरी खास तयार करण्याचा विचार करत होताो. आमच्या कारखान्यात अनेक मूर्त्या तयार केल्या जातात. त्यामुळे मलाही पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती तयार करण्याची कल्पना सूचली. 156 ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार करण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागला. या मूर्तीची अद्याप किंमत ठरलेली नाही. तसेच ही मूर्ती अद्याप विकण्याचा कोणताही विचार नाही. ही मूर्ती तयार करण्यासाठी 11 लाख रुपयांच्या सोन्याचा वापर करण्यात आला आहे. अनेक लोकांनी ही मूर्ती खरेदी करण्यासाठी उत्साह दर्शवला आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान मोदींची सोन्याची मूर्ती चर्चेचा विषय आहे. मूर्तीकारांनी ही मूर्ती विकण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही.
नरेंद्र मोदींचा पुतळा बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी इंदूर आणि अहमदाबादमधील काही व्यावसायिकांनी पीएम मोदींच्या मूर्ती बनवल्या आहेत. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर पीएम मोदींचे चित्र असलेली सोन्याची नाणीही मोठ्या प्रमाणात विकली गेली. अलीकडेच, मेरठ, यूपी येथे आयोजित केलेल्या दागिन्यांच्या प्रदर्शनात अनेक राज्यांतील सराफा व्यापाऱ्यांनी आपले दागिने प्रदर्शित केले. या प्रदर्शनात पंतप्रधान मोदींचे चित्र असलेली नाणी आकर्षणाचे केंद्र ठरली होती.