Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक सहकार क्षेत्राला दिशा देणारे – नरेश म्हस्के
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक सहकार क्षेत्राला दिशा देणारे – नरेश म्हस्के

admin
Last updated: 2025/03/27 at 3:01 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 27 मार्च (हिं.स.) – सहकाराच्या नावाखाली काँग्रेसने 50 वर्ष फक्त भ्रष्टाचारच केला आहे. केंद्रातील युतीच्या सरकारने नवसंशोधन व पारदर्शकता आणून सहकार क्षेत्राला समृद्धीच्या दिशेने नेले आहे. सहकारी व्यवस्थापन आणि त्याच्या शिक्षणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकाने नवे त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक 2025 आणले आहे. हे विधेयक सहकार क्षेत्राला दिशा देणारे ठरणारे आहे. स्वातंत्र्यापासून भ्रष्टाचाराला शिष्टाचार मानणारी काँग्रेस आणि उबाठा पक्षाची अभद्र आघाडी `इंडि’ नसून `औरंगजेब फॅन क्लब’ असल्याची घाणाघाती टीका ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज संसदेत केली.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी संसदेत त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक 2025 सादर केले आहे. या विधेयकावर शिवसेना पक्षाच्या वतीने बाजू मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष प्रतोद खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रारंभी आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या दूरदृष्टीमुळे सहकार क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा घडून आल्या आहेत. आज `सहकार’ आणि `सरकार’ दोन्ही मजबूत होत आहेत. गृहमंत्री म्हणून अमित शहा यांनी कलम 370 हटवून देशाच्या एकतेला नवा आयाम दिला आणि आता सहकारी क्षेत्रात सुधारणा करून लोकांना सक्षम बनवत आहेत. या उलट काँग्रेसच्या काळात सहकार क्षेत्राचा वापर भ्रष्टाचारासाठी केला गेला. जिथे आमच्या काळात `सहकारातून समृद्धी’ येत आहे, तिथे काँग्रेसने शेतकऱ्यांचे पैसे लुटून सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराचे अड्डे बनवले. ही तीच काँग्रेस आहे जी देशाच्या विकासावर गोचडीसारखी चिकटून राहिली. आज ते औरंगजेबच्या नावाने राजकारण करत आहेत, पण इतिहास सांगतो की औरंगजेबने `जिझिया कर’ लावून हिंदू धर्म संपवण्याचा प्रयत्न केला. तसेच काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी अनेक घोटाळे करून देशाला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचे काम केले. ही `इंडि’ आघाडी नसून ‘औरंगजेब फॅन क्लब’ असल्याची टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.

यावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी गोंधळ घालत खासदार नरेश म्हस्के यांचे भाषण बंद पडण्याचा प्रयत्न केला. उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी `पॉईंट ऑफ ऑर्डर’ करत सभापतींकडे भाषण थांबविण्याची मागणी केली. संसदेतील ज्येष्ठ खासदार नारायण राणे, खासदार निशिकांत दुबे, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दर्शन जरदोश आणि इतर ज्येष्ठ खासदारांनी नरेश म्हस्के यांची बाजू घेत विरोधी पक्षाची मागणी धुडकावून लावत `पॉईंट ऑफ ऑर्डर’ची हवाच काढली.

त्रिभुवन सहकारी विश्वविद्यालय विधेयक भारतातील सहकारी चळवळीला नवीन उंचीवर नेईल आणि जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनण्यासाठी सक्षम आहे. या विधेयकामुळे गुजरातमधील `इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट आनंद’ (IRMA) ला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला जाईल. सहकार क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनावर भर दिला जाईल. विद्यापीठाला डिग्री कोर्स, डिस्टन्स लर्निंग, ई-लर्निंग आणि देश-विदेशात शाखा स्थापन करण्याचा अधिकार असेल. 500 कोटींच्या भौतिक संरचनेच्या निर्मितीसाठी सरकारने यात तरतूद केली आहे. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक 2025 हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. सहकारी क्रांतीला मजबुती मिळावी यासाठी संसदेतील सर्व खासदारांनी या विधेयकास पाठिंबा द्यावा, असे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी शेवटी केले.

You Might Also Like

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार

अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख

भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विधिमंडळात १२ महत्त्वाचे कायदे मंजूर; अर्थसंकल्पावर सकारात्मक चर्चा – मुख्यमंत्री
Next Article प्रत्येक नागरिकाला प्रगतीचे पंख देण्याची क्षमता संविधानात – मुख्यमंत्री

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?