Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नाशिक अपघात : मृतांचा आकडा 11 वर, राज्य सरकारकडून 5 तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

नाशिक अपघात : मृतांचा आकडा 11 वर, राज्य सरकारकडून 5 तर केंद्राकडून 2 लाखांची मदत जाहीर

Surajya Digital
Last updated: 2022/10/08 at 10:39 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ नाशिक बस अपघाताचे अपडेट

नाशिक : नाशिक येथे खासगी बसला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. यामध्ये एका चिमुकल्याचा समावेश आहे. तर 21 जण जखमी झाले आहेत. यातील काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना नाशिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लक्झरी बस आणि टँकर यांच्यात आज शनिवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटाच्या सुमारास भीषण अपघातात झाला. Nashik accident: death toll rises to 11, state government announces 5 lakh aid, central government 2 lakhs

 

जखमींवर मोफत उपचार केले जातील, अशी माहिती नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. दरम्यान यवतमाळवरून ही बस मुंबईला जात होती. नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. नाशिक येथे बस व ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. यावेळी लागलेल्या आगीत 8 ते 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर अपघातातील जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला. या घटनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांसह आयुक्तांशी माझे बोलणे झाले आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू तर 38 जण जखमी झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथील बस दुर्घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहेत. जखमी लवकरात लवकर बरे होवोत, अशा सद्भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत. तर या आगीत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकाला PMNRF कडून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत पंतप्रधानांनी जाहीर केली आहे.

नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे हा मोठा अपघात झाला. अपघातात दहापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी करत यामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मृत आकड्यात वाढ होऊ शकते.

 

Maharashtra | A luxury bus & a trailer truck collided with each other. A fire broke out due to the impact. 11 casualties so far. 30 people had started from Yavatmal & 19 people boarded the bus in the middle. They are being identified: Nashik Police Commissioner Jayant Naiknavare pic.twitter.com/xjljXPdM1K

— ANI (@ANI) October 8, 2022

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

यवतमाळ येथून नाशिकमार्गे मुंबईला जाणाऱ्या चिंतामणी बसचा नांदूरनाका येथे भीषण अपघात झाला. यावेळी लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातातून वाचलेल्या महिला प्रवाशाने आपबीतीचा थरार सांगितला आहे. त्या म्हणाल्या की, आम्ही मुलाला घेऊन बाहेर पडलोत, मात्र तेथे बसलेल्या आजीला वाचवता आले नाही. अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आलं त्यांनी उड्या मारल्या तर आतमध्ये अडकलेले प्रवासी आगीमुळे जळून खाक झाले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

अपघातानंतर बस 50 ते 60 फूट पुढे घसरत गेली तर टँकर 70 ते 80 मीटर पुढे जाऊन थांबला. या अपघातात बसने पेट घेतल्याने जळून मयत झालेल्या नागरिकांचे मृतदेह महापालिकेच्या सिटी लिंक बसमधून हलविण्यात आले. या घटनेत 10 लोक जळून खाक झाले तर 34 जणांवर उपचार सुरू आहेत. सदर अपघात घडल्यानंतर रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी नवीन आडगाव नाक्यावर असलेल्या वाहतूक पोलीस चौकीत धाव घेतली. तसंच पोलिसांना याबाबत कळवलं. मात्र, पोलीस वेळेत घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

□ नाशिक बस अपघाताचे अपडेट

* नाशिक – औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे बस व ट्रेलरचा भीषण अपघात

* अपघातानंतर बसला आग, आगीत 8 ते 10 जणांचा मृत्यू

* यवतमाळ येथून नाशिकमार्गे मुंबईला ही बस जात होती.

* चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या या बसमध्ये 30 प्रवासी होते.

* आगीवर अग्नीशमन दलाच्या जवानांकडून नियंत्रण

* जखमींना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Nashik #accident #death #tollrises #stategovernment #announces #aid #centralgovernment #lakhs, #नाशिक #अपघात #मृत #आकडा #राज्यसरकार #केंद्रसरकार #मदत #जाहीर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आ. विजय देशमुखांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश
Next Article सोलापूर । ‘इंजेक्शन’ देताच आरोग्य खात्याची झोप उडाली तुकाराम मुंढे

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?