नाशिक / मुंबई : नाशिकमधील झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टाकीतून झालेल्या गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे, असंही ते म्हणाले.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1384806925129326592?s=20
* संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न – मुख्यमंत्री
नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
https://twitter.com/narendramodi/status/1384815961375531010?s=20
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या घटनेबद्दल व्यक्त केला शोक
नाशिक येथील डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजन लीक झाल्याची दुर्घटना घडली. यात 11 महिला आणि 11 पुरुषांचा मृत्यू झाला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. ‘ नाशिक येथील घटना अतिशय दुर्देवी आणि ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. असं पंतप्रधान मोदी ट्विट करुन म्हणाले.
नासिक के एक अस्पताल में ऑक्सिजन लीक होने से हुई दुर्घटना का समाचार सुन व्यथित हूँ। इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर अपनी गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ। बाकी सभी मरीजों की कुशलता के लिए ईश्वर से प्रार्थना करता हूँ।
— Amit Shah (@AmitShah) April 21, 2021
* नाशिक ऑक्सिजन गळती; अमित शाह यांची प्रतिक्रिया
नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेत जवळपास 22 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवर गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली. नाशिकच्या एका रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे झालेल्या दुर्घटनेचं वृत्त ऐकून मन सुन्न झालं. या दुर्घटनेत ज्या लोकांनी आपल्या माणसांना गमावलं, त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. इतर रुग्णांच्या प्रकृतीसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो, असं अमित शाह यांनी म्हटलं.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1384791060392550407?s=20
https://twitter.com/RajThackeray/status/1384825020241776648?s=20
* नाशिक ऑक्सिजन गळती- राज ठाकरेंची प्रतिक्रिया
नाशिकमधील झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन टाकीतून झालेल्या गळतीमुळे 22 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया- ‘ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना मनसेकडून श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकार शासन व्हायलाच हवं’.
* अजित पवारांनी दिले हे निर्देश
नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. तसेच नाशिक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य रुग्णालयामधील ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा तसेच रुग्णालयांच्या सुरक्षितता सुनिश्चित करण्यासंदर्भातील कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना अनुदान मिळणार https://t.co/h6iK9Kc3qh
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
* ऑक्सिजन गळती प्रकरण; ‘आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत’ – मंत्री राजेंद्र शिंगणे
नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीतून मोठ्या प्रमाणात गळती झाली. यामुळे व्हेंटीलेटरवर असलेले 11 रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी प्रतिक्रिया दिली. ही दुर्दैवी घटना आहे. आम्ही सविस्तर अहवाल मिळवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्ही चौकशीचे आदेशही दिले आहेत. जे जबाबदार आहेत त्यांना सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.