नाशिक, 27 एप्रिल (हिं.स.)।
शहरात कत्तलीसाठी आणण्यात येणाऱ्या सहा गोवंशांची शहर पोलिसांकडून सुटका करण्यात आली. गुंडा विरोधी पथकाने भोसला मिलिटरी स्कूल जवळील, गंगापुर रोड येथे सापळा रचत एम. एच. १५ एफ. व्ही. ९७२४ या क्रमांकाच्या बोलेरो पिकअप वाहन शहराच्या दिशेने येत असताना त्याची तपासणी केली. त्यामध्ये ६ गायी असल्याचे दिसून आले. यावेळी वाहन चालक नामदेव पावडे (वय ४२) रा. पिंपळद ता. जि. नाशिक आणि अस्कान उर्फ अप्यु अजीम कुरेशी (वय २४) रा. मदीना लॉन्स मागे, मदीनानगर नाशिक यांनी गिरणारे परिसरातील मोकळया रानामधुन या गायी पकडल्याचे सांगितले. तसेच सादीकनगर वडाळागाव येथील निसार कुरेशी याच्या गोडाऊनमध्ये त्या कत्तलीसाठी घेवून जात असल्याचे सांगितले.
या दोघांकडून सुमारे ५ लाख ६० हजार रुपये किंमतीचे गोधन जप्त करत त्यांना पुढील कारवाईसाठी गंगापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.