पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आपल्या वहिनीच्या घरी राहण्यासाठी गेली असताना आरोपी अबरार गफार शेख (वय २८, रा. मुस्लिमनगर, मालेगाव) याच्याशी तिची ओळख झाली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या इच्छेविरुद्ध चार ते पाच वेळा लैंगिक अत्याचार केला.
याशिवाय, अबरारने वेळोवेळी फिर्यादी आणि तिच्या आईकडून एकूण ३ लाख २० हजार रुपये घेतले. पैसे परत न देता त्यांची फसवणूक करत मानसिक त्रासही दिला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अबरार शेखविरुद्ध बलात्कार आणि फसवणुकीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सपकाळे करीत आहेत.
No WhatsApp Number Found!
WhatsApp us
Sign in to your account