Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नाशिक : रंगपंचमीला पूर्व वैमानसतून दोन भावांची हत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
गुन्हेगारी

नाशिक : रंगपंचमीला पूर्व वैमानसतून दोन भावांची हत्या

admin
Last updated: 2025/03/20 at 6:47 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

नाशिक, 20 मार्च (हिं.स.) : उपनगर परिसरात पूर्व वैमानसतून दोन सख्ख्या भावांचा खून केल्याची घटना रंगपंचमीच्या दिवशी रात्री घडल्यामुळे नाशिक शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे येथील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पूर्ववैमनस्य व वर्चस्वाच्या वादातून झालेल्या या धक्कादायक घटनेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे उपाध्यक्ष उमेश तथा मन्ना भगवान जाधव (वय ३२) व त्यांचे भाऊ प्रशांत भगवान जाधव (वय ३०, दोघे रा. आंबेडकरवाडी, नाशिक) या दोघांना प्राण गमवावे लागले. या घटनेने आंबेडकरवाडी परिसरात तणाव व शोकाकूल वातावरण असून, पोलिसांनी रात्री उशिरा ५ मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. शहरातील रंगोत्सव निर्विघ्नपणे पार पडल्याने विसावलेल्या पोलीस दलाची या घटनेमुळे धावपळ उडाली होती.

नाशिक-पुणे रोडवरील बोधलेनगर परिसरात असलेल्या आंबेडकरवाडी येथे रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तसेच मयत जाधव बंधू यांचे मामा विनोद धोंडीराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्री साडे नऊ वाजता आंबेडकरवाडी परिसरात बनकर चौक पिठाच्या गिरणीजवळ जाधव बंधू तसेच नितीन हटकर, मयूर भोये, आदित्य व विनोद पवार हे आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात चर्चा करीत होते. यादरम्यान उमेश यास फोन आला. आईने घरी जेवणासाठी बोलावल्याने उमेश घरी जाऊ लागला. उमेश जाधव हे सार्वजनिक शौचालयाजवळून घरी परतत असताना त्यांना काही जण मारहाण करीत असल्याचे दिसले. हे पाहून त्यांचे भाऊ प्रशांत जाधव हे भावाला वाचविण्यासाठी धावून गेले.

तेव्हा शस्त्रधारी मारेकऱ्यांनी उमेश जाधव यांच्यासह प्रशांत जाधव यांच्यावरही प्राणघातक हल्ला चढविला. कोणी मध्ये आले तर संपवून टाकू, अशी धमकी मारेकऱ्यांनी दिल्याने जाधव बंधू यांच्या सोबत असलेले सहकारी दहशतीने बाजूला झाले. उमेश व प्रशांत यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने ते गंभीर जखमी झाल्यानंतर मारेकरी दुचाकीने पळून गेले. त्यानंतर जाधव बंधूंना सहकाऱ्यांनी प्रथम खासगी व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे आदींनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आंबेडकरवाडीत तणावाचे वातावरण होते. जाधव बंधूंचा मृत्यू झाल्याचे समजताच जिल्हा शासकीय रुग्णालयात शोकाकुल नातेवाईक, तसेच मित्र परिवाराने गर्दी केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलविली. रात्री उशिरा गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री उशिरा उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे करीत आहेत.

You Might Also Like

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

पाठीमागून गाडीला धडक दिली, मग पुढे काय निघाला कोयता, राॅड आणि काठी… कुठं घडले हे …?

दुप्पट नोटा देतो म्हणून १० लाखास गंडवले ; कोणाला, कसं अन् कुठे ?

जळगाव : दारूच्या नशेत पतीनेच केली पत्नीची हत्या

महूदला कोयत्याने वार… मग पुढे ‘हे’ झाल खरतनाक

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छत्तीसगड : दोन विविध चकमकीत 24 नक्षलवादी ठार
Next Article हत्ती तलावाच्या संगीत कारंजेसाठी पाच कोटींचा निधी मंजूर; शहराच्या सौंदर्य वृद्धीसाठीच्या या कामासाठीच्या 10 कोटींच्या निधीने आणखी एक पाऊल पुढे :- आ सचिन कल्याणशेट्टी.

Latest News

अक्कलकोटच्या तलाठ्यास 3 हजारांची लाच घेताना अटक
महाराष्ट्र June 12, 2025
एअर इंडियाने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रोफाइल पिक्चर केले काळ्या रंगाचे
महाराष्ट्र June 12, 2025
एक देश एक निवडणूक देशाला महासत्ता बनवेल : डॉ अजित गोपछडे
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेवून जाणारं विमान कोसळलं
महाराष्ट्र June 12, 2025
अहमदाबाद : विमान दुर्घटनेवर अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केले दुःख
महाराष्ट्र June 12, 2025
विमान कंपन्यांनी सुरक्षितता मानकांचे पालन करावे – उपमुख्यमंत्री
देश - विदेश June 12, 2025
अहमदाबादमधील ही दुर्घटना सुन्न आणि व्यथित करणारी – नरेंद्र मोदी
देश - विदेश June 12, 2025
शनिवारनंतर रस्त्यावर चिटपाखरूही फिरू दिले जाणार नाही – राजू शेट्टी
महाराष्ट्र June 12, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?