Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रात्री उशीरा नाथाभाऊंची भेट, मुख्यमंत्र्यांना एक फोन, ‘जळगावा’त झाले ‘सत्तांतर’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

रात्री उशीरा नाथाभाऊंची भेट, मुख्यमंत्र्यांना एक फोन, ‘जळगावा’त झाले ‘सत्तांतर’

Surajya Digital
Last updated: 2021/03/18 at 11:05 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

जळगाव : भाजपातून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे यांनी जळगावच्या विकासाकरता उचलेला सत्ता परिवर्तनाचा ‘विडा’ आज खरा करुन दाखविला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने जळगाव मनपात सत्तांतर घडवून आणले. आता सत्तांतराकरीता लागणारी नगरसेवकांची 45 ची संख्यावर जाऊन पोहचली आहे.

कामे होत नसल्यामुुळे आणि भ्रष्टाचार वाढल्यामुळे सगळे नगरसेवक आणि जनता देखील नाराज होती. त्यामुळे महापालिकेत भाजपाला पराभवाची धूळ चारायची हा सगळा प्लॅन होता. पण गेल्या 10 दिवसांत त्याला वेग आला अन् सर्वकाही जुळून आल्याचे खडसे म्हणाले. आमच्याकडे येण्यासाठी नगरसेवकांना फारसा आग्रह करावा लागला नाही.

महानगरपालिका निवडणुकीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेविषयी देखील खडसेंनी सांगितले. 10 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली. मी त्यांना सांगितलं की तुम्ही महापौरपदासाठी तुमचा उमेदवार दिला, तर मी मदत करेन. त्यानंतर एकनाथ शिंदे, विनायक राऊत यांच्यासोबत चर्चा झाली.

त्यानंतर नाराज नगरसेवकांना फार आग्रह करण्याची गरजच पडली नाही. यातले बरेच नगरसेवक मला आधी भेटून गेले होते. त्यानंतर हा सगळा प्लॅन ठरला. आमच्याकडे आलेले 22 होते, शिवसेनेचे 15 होते आणि एमआयएमचे 3 आमच्याकडे आल्याचे खडसे म्हणाले.


* नाथाभाऊंचा मुख्यमंत्र्यांना तो एक फोन

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते एकनाथरावजी खडसे यांनी 8-10 दिवसांपूर्वी काही कामानिमित्त मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना फोन केला, फोनवर चर्चा करत असतांना नाथाभाऊंनी जळगाव शहरात रस्त्यांची झालेली दूरवस्था, रखडलेले विकास काम याबद्दल माहिती मुख्यमंत्र्यांना दिली, त्याचप्रमाणे आपण राज्याचे प्रमुख या नात्याने जळगाव शहराकडे लक्ष देऊन शहराच्या विकासाला लागलेल ग्रहण सोडवावं, अशी विनंती केली.

यावर मुख्यमंत्र्यांनी जळगाव मनपाच्या निवडणुकीला किती अवधी आहे, अशी विचारणा नाथाभाऊंना केली. निवडणुकीस अडीच वर्ष बाकी आहे, परंतु येणाऱ्या 15 दिवसात महापौर आणि उपमहापौर पदाची निवड प्रक्रिया होणार आहे.

आपल्या संपर्कात भाजपाचे 22-25 नगरसेवक आहे, त्यांची सत्ताधारी पक्षाविषयी प्रचंड नाराजी आहे आणि शहराच्या विकासाकरीता बदल व्हावा, असे मत देखील त्यांनी नाथाभाऊंनी व्यक्त केले आहे. तसेच जळगाव शहर विकास कामांना गती यावी म्हणून शिवसेनेचा महापौर होणार असेल, तर मी यात मदत करु शकेल, असं नाथाभाऊंनी सांगितलं.

* एकनाथ शिंदे यांच्याकडे जबाबदारी

मुख्यमंत्र्यांनी विनायक राऊतांशी चर्चा करुन तुम्ही ठरवा, असे सांगितले त्यानंतर काही वेळातच विनायक राऊत यांनी नाथाभाऊंना फोन करुन सत्तांतराबाबत चर्चा केली, त्यानंतर, उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी सोपवली आणि त्यानुसार एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये संवाद झाला.

संवादा दरम्यान महापौर शिवसेनेचा आणि उपमहापौर फुटीर नगरसेवकांमधून नाथाभाऊ निर्णय घेतील असं ठरलं. 4-5 दिवसांपूर्वी सुनील खडके आणि त्यांच्या संपर्कात असलेले 10-12 नगरसेवकांनी मुक्ताईनगर येथील खडसे फार्म हाऊसवर रात्री उशीरा नाथाभाऊंची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

जळगावच्या विकासासाठी सत्तांतर करण्याकरीता पुढाकार घ्यावा, आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली सत्तांतर करु असा विश्वास दिला, यावेळी खडसेंनी उपस्थित नगरसेवकांना पक्षांतर बंदी कायद्याची जाणीव सर्वांना करुन दिली, त्यामुळे याचा विचार करावा असे सांगितले. परंतु नगरसेवकांनी नाथाभाऊ नेतृत्व करावं आमचे सदस्यत्व गेलं तरी चालेल पण शहराच्या विकासाकरता महानगरपालिकेत तुमच्या नेतृत्वाची गरज असल्याचे सुर काढले, त्यानंतर नाथाभाऊंनी नगरसेवकांच्या इच्छानुसार सत्तांतराचा विडा हाती घेतला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बघता बघता नगरसेवकांची संख्या 22 वर येऊन पोहचली. तसेच शिवसेनेच नगरसेवक सुनील महाजन यांनी नाथाभाऊंना भेटण्याकरीता रात्री एकांतात भेट घेतली, त्यावेळी सुनिल महाजन यांनी महापौरपदाकरीता त्यांच्या पत्नी जयश्री महाजन यांना महापौरपद द्यावं, त्याकरीता शिवसेनेचे 15 आणि एम.आ.एम.च्या ३ नगरसेवक यांची संमती आहे.

आपण शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांशी बोलून माझ्या पत्नीच्या महापौरपदाकरता शिफारस करावी अशी विनंती केली. त्यानंतर नाथाभाऊंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदे, विनायक राऊत या नेत्यांशी चर्चा केली, यावेळी महापौर पदाकरता जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर पदाकरता सुनील खडके यांच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.

त्यानंतर सर्व नगरसेवकांची व्यवस्था ही शिवसेना करेल असे ठरलं आणि त्यामुळे शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांनी सुचवल्याप्रमाणे मनपा सत्तांतराकरता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगाव मनपाचे खडसे समर्थक नगरसेवकांसोबत शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांना पाठवण्यात आले. सर्व नगरसेवक मुंबईकडे रवाना करण्यात आले.

नंतर 2 दिवसांपूर्वी खडसे देखील मुंबईत दाखल झाले आणि शिवसेना नेते तसेच एकनाथ खडसे यांच्यात 2-3 वेळा चर्चा झाली. यावेळी जळगाव शहरातील सामाजिक गणितानुसार उपमहापौरपद सुनिल खडकेंना न देता मराठा समाजाला संधी द्यावी आणि स्थायी समितीचं सभापती पद सुनील खडकेंना देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह अन्य शिवसेना नेत्यांनी दिलेल आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #Nathabhau's #visit #latenight #phonecall #CM #independence #Jalgaon, #रात्रीउशीरा #नाथाभाऊंची #भेट #मुख्यमंत्र्यांना #एकफोन #जळगावात #सत्तांतर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिंदू गावावर सशस्त्र हल्ला; गावातील लोक घरदार सोडून पळाले
Next Article शिक्षकाचा संपूर्ण पगार ३६ लाख, मात्र ११ तासांच्या चौकशीनंतर निघाली पाच कोटीची संपत्ती

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?