Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सांगली : ह्रदय शस्ञक्रियेसाठी 29 बालके मुंबईला रवाना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सांगली : ह्रदय शस्ञक्रियेसाठी 29 बालके मुंबईला रवाना

admin
Last updated: 2025/03/28 at 3:22 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सांगली, 28 मार्च (हिं.स.)।

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 29 बालके हृदय शस्त्रक्रियेसाठी मुंबईला रवाना झाली असून, त्यांना जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिभीषण सारंगकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

जिल्ह्यातील 29 बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ठाणे येथे तज्ज्ञ डॉक्टर उपचार करणार आहेत. ही बालके अत्यंत सुरक्षित हातात आहेत. शस्त्रक्रियेवरून परत आल्यानंतर या बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेला दिसेल. सर्व मुलांना सुदृढ आयुष्य लाभो, अशी प्रार्थना करून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी बालकांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पना व प्रयत्नामधून 0 ते 18 वर्षे वयोगटातील ह्रदयरोग संशयित बालकांकरिता 13 मार्च रोजी मोफत 2 डी इको शिबिर घेण्यात आले होते. शिबिरांतर्गत ह्रदय शस्ञक्रियेकरिता संदर्भित करण्यात आलेल्या व यापूर्वी प्रलंबित असलेल्या 29 बालकांना ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये ह्रदय शस्ञक्रियेकरिता मोफत प्रवास, निवास व भोजन व्यवस्थेसह सिव्हील हॉस्पीटल सांगली येथून पाठविण्यात आले.

संपूर्ण राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मोहीम स्वरुपात राबविण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंञी प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेतून राज्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटापर्यंतची बालके तसेच किशोरवयीन मुलामुलींच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग, नगरविकास यांच्या समन्वयाने मोहीम राज्यस्तरावर राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार हा उपक्रम राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येत आहे.

बालक व पालक असे एकूण 47 प्रवासी यांना मोफत प्रवास, निवास, भोजन खर्चासहित शस्ञक्रियेकरिता ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. प्रती शस्ञक्रिया 4 लक्ष प्रमाणे अंदाजित खर्च हा रु. 1 कोटी 20 लक्ष रक्कमेच्या शस्ञक्रिया या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, महात्मा फुले जन आरोग्य योजना, खाजगी रक्कम दाते, धर्मादाय संस्था इत्यादी मधून अनुदान उपलब्ध करुन पूर्णपणे मोफत होणार आहेत.

बालकांच्या प्रवासाकरिता महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंञी प्रताप सरनाईक यांच्यामार्फत उच्च दर्जाची बससेवा मोफत उपलब्ध करुन दिली आहे.

You Might Also Like

भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात

राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन

‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू

रत्नागिरी : हिंदीची सक्ती न करण्याचे मनसेकडून शाळांना निवेदन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलीस दलाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोंची तपासणी करावी – चंद्रकांत पाटील
Next Article जिल्हा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसाठी आराखडा तयार करा – चंद्रकांत पाटील

Latest News

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
देश - विदेश June 19, 2025
इराणमधून ११० विद्यार्थ्यांची पहिली तुकडी भारतात परतली
देश - विदेश June 19, 2025
भारतीय संघाच्या मिशन इंग्लंडला उद्यापासून सुरुवात
महाराष्ट्र June 19, 2025
राज्यातील शाळांमध्ये होणार मोबाईल बंदी ? शिक्षक सुधीर केनेंचे संशोधन
महाराष्ट्र June 19, 2025
इराण- इस्रायल युद्ध पेटले, अमेरिकेचे ४० हजार सैन्य अलर्टवर
देश - विदेश June 19, 2025
‘विठ्ठल नामात होऊनिया दंग’ चा वारीमध्ये सहभागी होऊन प्रचार करणार – स्वरूप भाळवणकर
महाराष्ट्र June 19, 2025
इलॉन मस्क यांच्या स्टारशिप प्रोजेक्टच्या चाचणीदरम्यान स्पेसएक्सच्या संशोधन केंद्रात स्फोट
देश - विदेश June 19, 2025
कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस सुधारित एलएचबी डब्यांसह प्रवाशांच्या सेवेत रुजू
महाराष्ट्र June 19, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?