Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नॅशनल हेरॉल्ड : ईडीने सुरू केली मालमत्ता जप्तीची प्रक्रिया
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

नॅशनल हेरॉल्ड : ईडीने सुरू केली मालमत्ता जप्तीची प्रक्रिया

admin
Last updated: 2025/04/12 at 6:23 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली,12 एप्रिल (हिं.स.) : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) कंपनीच्या 700 कोटींहून अधिक किंमतीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया आज, शनिवारी सुरू केली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, लखनऊ इत्यादी महत्त्वपूर्ण जागांचा समावेश आहे.

ईडीने सांगितले की, ही कारवाई एजेएल मनी-लॉन्डरिंग प्रकरणाच्या अनुषंगाने केली जात आहे. ही प्रक्रिया प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अ‍ॅक्ट (पीएमएलए) 2002 च्या कलम 8 आणि मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक नियम 2013 अंतर्गत करण्यात येत आहे. नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र प्रकाशित करणारी कंपनी एजेएल ही यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या कंपनीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे प्रत्येकी 38 टक्के शेअर्स आहेत, ज्यामुळे ते मुख्य भागीदार ठरतात. यातील उर्वरीत सहभागी मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस या काँग्रेस नेत्यांचे निधन झाले आहे. नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र एजेएल कंपनीमार्फत प्रकाशित केले जाते. ही कंपनी 1937 मध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुरू झाली होती आणि नंतर काँग्रेसशी निगडित राहिली.काही काळासाठी नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र बंद पडले, पण एजेएलकडे अजूनही देशभरात अनेक मौल्यवान मालमत्ता शिल्लक आहेत.

यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड ही नवी कंपनी 2010 मध्ये स्थापन झाली, ज्यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे प्रत्येकी 38 टक्के शेअर्स आहेत. उर्वरित शेअर्स काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा व ऑस्कर फर्नांडिस यांच्या नावे होते. काँग्रेस पक्षाने एजेएलला दिलेल्या सुमारे 90 कोटी रुपयांच्या कर्जाची वसुली न करता, यंग इंडियन कंपनीला एजेएलचे संपूर्ण नियंत्रण व मालकी दिली गेली. ही गोष्ट मुळातच वादग्रस्त ठरली. या व्यवहारावरून भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आणि पुढे चौकशी सुरू झाली.

ईडीने पीएमएलए अंतर्गत या व्यवहाराची चौकशी केली.ईडीच्या मते, या व्यवहारात काँग्रेस पक्षाच्या देणग्यांचा गैरवापर करून, बनावट आर्थिक व्यवहार करण्यात आले. ईडीने नोव्हेंबर 2023 मध्ये दिल्ली, मुंबई व लखनौमधील मालमत्तांवर तात्पुरता ताबा ठेवला होता. आता एप्रिल 2025 मध्ये ईडीने कलम 8 अंतर्गत ही मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया औपचारिकरित्या सुरू केली आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान हुतात्मा
Next Article सप्तशृंगी गडावरील चैत्र उत्सवाची सांगता, लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?