अमरावती, १८ ऑगस्ट – राणा दाम्पत्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील ऑपरेशन सिंदूरला समर्पित दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. या कार्यक्रमात भाषण करताना माजी खासदार नवनीत राणा यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, “पाकिस्तानमध्ये बसून खूप नारे लावत आहेत, पण पाकिस्तानचा भुट्टो भारतात आला तर त्याचे काय हाल होतात ते दाखवून देऊ. खुद के घर में कुत्ता भी शेर बनता है. मी फायर आहे, फ्लॉवर नाही.”
नवनीत राणा यांनी स्पष्ट केले की या देशात काँग्रेसचे नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच राज्य आहे. त्यांनी पाकिस्तानवर टीका करताना सांगितले की, “आता फक्त पाणी बंद केले आहे, पण अन्नधान्यही बंद करू शकतो. त्यानंतर पाकिस्तान भारतासमोर कटोरे घेऊन भीक मागण्यासाठी येईल. बाप तो बाप रहेगा, हिंदुस्तान बाप रहेगा.”
यावेळी राणा यांनी “पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तानी सैनिक मुर्दाबाद” अशा घोषणा दिल्या. त्या म्हणाल्या, “मी एकाच माणसासमोर झुकते, ते फक्त रवी राणा.”
आपल्या भाषणात त्यांनी ऑपरेशन सिंदूरची महती सांगत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे देश एकसंघ असल्याचेही अधोरेखित केले.