अमरावती, 20 एप्रिल, (हिं.स.) -शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावावरून अवघा महाराष्ट्र ढवळून निघू लागला आहे. भाजप महायुतीमधून या युतीवर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरुद्ध पंगा घेतलेल्या माजी खासदार भाजप नेत्या नवनीत राणा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
युतीसाठी शुभेच्छा देताना, दोघं सोबत येत असतील, तर कुणी कांटा बनणार नाही, अशी ग्वाही देखील नवनीत राणा यांनी दिली.
नवनीत राणा म्हणाल्या, परिवार संपूर्ण देशासमोर आला, तो वाद बाहेर आणणारे कोण होते, ते आम्हाला माहित होते. राजकारणी व्यक्ती कमी, पण एका कुटुंबात राहणारी व्यक्ती म्हणून आम्ही त्या दोघांना शुभेच्छा देतो.ते जर सोबत येत असतील, तर त्यांच्यामध्ये कुणी कांटा बनणार नाही. हिंदुत्ववादाची लढाई भगव्यासाठीच राहणार आहे, असेही राणा यांनी सांगितले.