Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी घेतली मंत्री तानाजी सावंत भेट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे यांनी घेतली मंत्री तानाजी सावंत भेट

Surajya Digital
Last updated: 2022/09/11 at 10:52 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

□ पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली आहे. मंत्री तानाजी सावंत गेल्या आठवड्यात पंढरपूरच्या दौऱ्यावर आल्यावर पंढरपूर येथील त्यांच्या पुतणे अनिल सावंत यांच्या घरी कल्याण काळे यांनी भेट घेतली. त्यामुळे कल्याण काळे एकनाथ शिंदे गटात जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. NCP leader Kalyan Kale met Minister Tanaji Sawant

Contents
□ पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर कल्याण काळे यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेते मंडळींचे भाजपमध्ये जोरदार इनकॉमिनग सुरू होते. त्यावेळी कल्याण काळे यांनी काँग्रेसचा हाथ सोडून आणि विठ्ठल परिवाराची साथ सोडून भाजपवासी झाले होते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी माढा विधानसभेची जागा काँग्रेसला मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कल्याणराव काळे शिवसेनेत गेले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचे ठरवल्यावर त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवले होते. कल्याणराव काळे फार फार दिवस शिवबंधनात राहिले नाहीत. त्यांनी लगेच घर वापसी केली होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या आर्थिक गणितासाठी कल्याणराव काळे यांना अनेकवेळा पक्षांतर करण्याची वेळ आली होती. गेल्या वर्षी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे गिफ्ट म्हणून सरकारने त्यांच्या साखर कारखान्याला थकहमी देखील दिली होती. असे असताना त्यांच्या कारखान्यावर साखर आयुक्तांनी हंगाम संपत असताना आरआरसीची कारवाई केली होती.

एक महिन्यावर ऊस हंगाम येऊन ठेपला असताना कल्याणराव काळे यांनी मंत्री तानाजी सावंत यांची घेतलेली भेट, त्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ही सदिच्छा भेट असली तरी या भेटीचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातून एकनाथ शिंदे गटात कोणाला घ्यायचे याचे सर्व अधिकार हे मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे.

 

 

“गेल्या आठवड्यात तानाजी सावंत यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यामागे कोणतेही राजकारण नाही. मी सदिच्छा भेट घेतली होती”

– कल्याणराव काळे, चेअरमन – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #NCP #leader #KalyanraoKale #meet #Minister #TanajiSawant, #राष्ट्रवादी #नेते #कल्याणरावकाळे #मंत्री #तानाजीसावंत #भेट #राजकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री किसान योजना, शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये
Next Article 25 years कल्लोळाच्या पाण्याने केले यमाईचे चरणस्पर्श; 25 वर्षांनंतर आला असा योग

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?