Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह प्रणिती शिंदे, बबनराव शिंदे अधिवेशनास गैरहजर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह प्रणिती शिंदे, बबनराव शिंदे अधिवेशनास गैरहजर

Surajya Digital
Last updated: 2022/07/03 at 5:30 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
● अधिवेशनातही ‘काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’ चा संवादस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट… 》 विधानसभा अध्यक्षपदासाठी कुणी मतदान केलं नाही?

● अधिवेशनातही ‘काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’ चा संवाद

 

मुंबई : राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांनी 164 मतं मिळाली आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या राजन साळवींना 107 मतं मिळाली. 3 आमदार हे तटस्थ होते. समाजवादी पक्ष आणि एमआयएम पक्षांनी या निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली.  Praniti Shinde, along with seven NCP MLAs, Babanrao Shinde absent from the convention

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक सात आमदार आज सभागृहात नव्हते. राष्ट्रावादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे कोठडीत असल्याने ते आज उपस्थित राहू शकले नाहीत. तर आमदार निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे पाच आमदारही गैरहजर होते.

मतदान सुरू असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांची मतदानाची वेळ येताच,विरोधी बाकावरील सदस्यांनी एका सूरात ‘काय झाडी,काय डोंगार,काय हाटील’असा संवाल झाला. यामुळेच सभागृहात एकच हशा पिकला.

 

राष्ट्रवादीचे सदस्य दिलीप मोहिते आणि अण्णा बनसोडे उशीरा आल्याने त्यांना मतदान प्रक्रियेत भाग घेता आला नाही.तर कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे १० सदस्य गैरहजर होते.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारने बाजी मारली असली तरी उद्या होणारी बहुमत चाचणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ते गैरहजर होते. राष्ट्रवादीचे सदस्य बबनराव शिंदे, निलेश लंके, तर भाजपचे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक आजारी असल्याने मतदान प्रक्रियेत भाग घेवू शकले नाहीत. कॉग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि एमआयएमचे मुफ्ती इस्माईल हे गैरहजर होते.

काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा आज विवाह होता त्यामुळे तेही गैरहजर होते. शिंदे गटात असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यासह अपक्ष आमदार आणि बहुजन विकास आघाडीच्या सदस्यांनी नार्वेकर यांच्या बाजूने मतदान केले.

 

》 राष्ट्रवादीचे 7 आमदार अधिवेशनात गैरहजर

 

आज विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली. यावेळी मात्र राष्ट्रवादीचे सात आमदार अधिवेशनाला हजर नव्हते. राष्ट्रवादीचे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने ते येऊ शकले नाहीत. निलेश लंके हे आजारी असल्याने शिरूरमध्ये एका रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र बाकीचे आमदार का आले नाहीत हे अजून कळालं नाही.

》 विधानसभा अध्यक्षपदासाठी कुणी मतदान केलं नाही?

 

– मुक्ता टिळक, भाजप

– लक्ष्मण जगताप, भाजप

– प्रणिती शिंदे, काँग्रेस

– जितेश अंतापूरकर, काँग्रेस

* राष्ट्रवादी

– नवाब मलिक, अनिल देशमुख, निलेश लंके, दिलीप मोहिते,
दत्तात्रेय भरणे, अण्णा बनसोडे, बबनदादा शिंदे

* एमआयएम – मुफ्ती इस्माईल.

 

 

You Might Also Like

महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर

रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात

राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ

सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना

TAGGED: #PranitiShinde #along #seven #NCP #MLAs #BabanraoShinde #absent #convention #political, #राष्ट्रवादी #सात #आमदार #प्रणितीशिंदे #बबनरावशिंदे #अधिवेशन #गैरहजर #राजकारण #सभापती #अध्यक्ष
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सर्वात तरुण शिवसेनेतून फुटलेले राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदी
Next Article हकालपट्टीच्या खोट्या बातमीनंतर ठाकरेंचा आढळरावांना फोन, आढळरावांनी दिला सूचक इशारा

Latest News

रवींद्र जाडेजा आयसीसी कसोटी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर राहणारा पहिला खेळाडू
देश - विदेश May 14, 2025
महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती जगभरात पोहोचण्याची गरज : विष्णू मनोहर
महाराष्ट्र May 14, 2025
ऑस्कर विजेते हॉलीवूड दिग्दर्शक रॉबर्ट बेंटन यांचे निधन
देश - विदेश May 14, 2025
रेशनकार्डसाठी लाच घेणाऱ्या पुरवठा अधिकाऱ्यास पकडले, खासगी एजंटही जाळ्यात
महाराष्ट्र May 14, 2025
राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आमचा आजही सकारात्मक प्रतिसाद – संजय राऊत
राजकारण May 14, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा – हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्र May 14, 2025
सातार्‍यात ‘टेस्ला’चे युनिट येणार; जिल्ह्याच्या विकासाला चालना
महाराष्ट्र May 14, 2025
पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून मालेगावचा तरुण ताब्यात
महाराष्ट्र May 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?