Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: एनसीपीच्या रूपाली चाकणकरांचे पुण्यातील कार्यालय पेटवून देण्याची सांगलीतून धमकी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीराजकारण

एनसीपीच्या रूपाली चाकणकरांचे पुण्यातील कार्यालय पेटवून देण्याची सांगलीतून धमकी

Surajya Digital
Last updated: 2020/12/26 at 12:58 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना एका व्यक्तीने अर्वाच्च भाषा वापरात त्यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. रूपाली चाकणकर यांच्या पुण्यातील ऑफिसातील फोन नंबरवर फोन करून त्यांनी ही धमकी देण्यात आली आहे.

जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता.वाळवा, जि. सांगली) असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. धायरी येथील गारमाळ परिसरातील ब्रह्मगिरी आर्केडमध्ये रूपारी चाकणकर यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. याच कार्यालयात धमकीचा फोन आल्याची माहिती रूपाली चाकणकर यांचे स्वीय सहायक राजदीप राजेंद्र कठाळे (वय-25, रा. धायरी) यांनी पोलिसांना दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्या पुण्यातील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर काल शुक्रवारी धमकीचा फोन आला. आरोपीनं जयंत रामचंद्र पाटील बोलत असल्याचं सांगून ही धमकी दिली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

दरम्यान, या आधी रुपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लिल कमेंट्स केल्या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर आरोपी वारंवार अश्लिल कमेंट्स करत होते. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

* अशी होती भाषा आणि संवाद

‘मला रूपालीबाई चाकणकर यांचा मोबाइल नंबर दे, ती काय करते ते बघतोच, असंही आरोपी म्हणाला. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली येथून बोलत असल्याचं आरोपीन सांगितलं. रूपाली चाकणकर यांचा नंबर न दिल्यानं आरोपी आणखी चिडला. तो म्हणाला, तुला नंबर द्यायचा आहे की नाही. मी कोण आहे तुला माहिती नाही. तुला तुमचे कार्यकर्ते किंवा पोलीस बोलवायचे असतील तर बोलव. मी घाबरत नाही. रूपाली चाकणकर यांचे कार्यालय पेटवून देईन, अशा अर्वाच्च भाषेत आरोपीनं धमकी दिल्याचं फिर्यादी राजदीप राजेंद्र कठाळे यांनी सांगितलं आहे.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

TAGGED: #एनसीपीच्या #रूपालीचाकणकरांचे #पुण्यातील #कार्यालय #पेटवून #देण्याची #धमकी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विश्व विक्रम : ५ महिन्यांची गर्भवती ६२ मिनिटात धावली १० किलोमीटर
Next Article नववधू निघाली पाच महिन्याची गर्भवती, कुटुंब गेले हादरुन

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?