Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांच्या युपीए अध्यक्ष पदाच्या चर्चेवर राष्ट्रवादीची धक्कादायक प्रतिक्रिया
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारण

शरद पवारांच्या युपीए अध्यक्ष पदाच्या चर्चेवर राष्ट्रवादीची धक्कादायक प्रतिक्रिया

Surajya Digital
Last updated: 2020/12/11 at 10:15 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याची चर्चा काल गुरुवारी दिल्लीत रंगली होती. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार नसल्याने शरद पवार यांच्या नावाची चर्चा असून त्यांच्याकडे युपीएचं अध्यक्षपद सोपवलं जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. लवकरच शरद पवार युपीएचं अध्यक्षपद स्वीकारतील, असा दावाही केला जात आहे. दरम्यान या सर्व घडामोडींवर पक्षाकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मात्र या नावाच्या चर्चेवर राष्ट्रवादीने धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या सर्व बातम्या निराधार असल्याचं सांगत वृत्त फेटाळून लावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तापसे यांनी प्रसारमाध्यमांनी निर्धास्तपणे शरद पवार युपीएचे नवे अध्यक्ष होणार असल्याचं वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. “युपीएमध्ये अशा प्रस्तावासंबंधी कोणतीही चर्चा झालेली नाही हे राष्ट्रवादी काँग्रेस स्पष्ट करु इच्छित आहे,” असं महेश तपासे यांनी म्हटलं आहे.

*  लक्ष हटवण्यासाठी बातमी पेरली

“सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन लक्ष हटवण्यासाठी काहीजणांनी हेतू परस्पर ही बातमी पेरली असल्याचं दिसत आहे,” अशी टीकाही यावेळी महेश तपास यांनी केली.

“युपीएच्या अध्यक्षपदाबाबत बोलायचं झालं तर, शिवसेना काही यूपीएची सदस्य नाही. त्यामुळे मी कसं काय याबाबत मत व्यक्त करू? महाराष्ट्रातील महाविकासआघाडीत आम्ही आहोत. पण अद्याप आम्ही युपीएचे सदस्य नाही. त्यामुळे मी त्यावर मतप्रदर्शन करणार नाही. भविष्यात राजकारणात काय होईल. हे मी आत्ता सांगू शकत नाही.”

संजय राऊत – शिवसेना नेते

You Might Also Like

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्रच मोर्चा काढणार – संजय राऊत

वाढीव मतांवरील निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार – प्रकाश आंबेडकर

फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये

उबाठाच्या दोन माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

TAGGED: #शरदपवारांच्या #युपीएअध्यक्ष #पदाच्याचर्चेवर #राष्ट्रवादीची #धक्कादायक #प्रतिक्रिया
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधानपदाच्या उमेदवारासह यूपीए अध्यक्षपदाच्या नावासाठी सुरु झाली शरद पवारांच्या नावाची चर्चा
Next Article एकतर्फी प्रेमकरणातून दुहेरी हत्याकांडने नागपूर हादरले

Latest News

पहिली ते चौथी हिंदी भाषा नसावी – उपमुख्यमंत्री पवार
Top News June 27, 2025
गुजरात : जगन्नाथ रथयात्रेत बिथरले हत्ती, अनेक जखमी
देश - विदेश June 27, 2025
आषाढी एकादशीनिमित्त पुणे विभागातून आणखी तीन विशेष रेल्वे
Top News June 27, 2025
उबाठा कामगार सेनेचे डॉ.काकडे यांचा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
महाराष्ट्र June 27, 2025
युद्धबंदीनंतरही इस्रायलचा इराणला त्यांचे युरेनियम परत करण्याचा इशारा
देश - विदेश June 27, 2025
युद्धविरामानंतर खामेनी यांचा इस्रायल विरुद्धच्या युद्धात विजयाचा दावा
देश - विदेश June 27, 2025
तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला – डॉ. जब्बार पटेल
महाराष्ट्र June 27, 2025
पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला
महाराष्ट्र June 27, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?