बीड, 8 ऑक्टोबर। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बीड जिल्ह्यात खिंडार पडले आहे. शरद पवारांच्या जिल्हाध्यक्ष सह असंख्य कार्यकर्त्यांचा रमेश आडसकरच्या नेतृत्वात अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बीड जिल्ह्यात मोठे खंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी देशमुख, तालुका अध्यक्ष, मराठा महासंघ महिला तालुकाध्यक्ष सह दीडशे पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी आज रमेश रावजी आडसकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात पक्षप्रवेश केला आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बीड जिल्ह्यामध्ये मोठे खिंडार पडले आहे.
आजच्या या पक्षप्रवेशामुळे रमेशराव आडसकर साहेबांना मानणारा वर्ग या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक ही नेत्यासाठी कष्ट घेणाऱ्या कार्यकर्त्यांची निवडणुक आहे. आजच्या या पक्षप्रवेशाने अजित दादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी मिळाली आहे. सर्वांनी गटतट बाजुला ठेवून पक्षाचे काम पक्षानी राबवलेल्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य जनते पर्यंत पोचवून एकजुटीने काम करा असे रमेश राव आडसकर पुढे म्हणाले.
अंबेजोगाई तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटचा आढावा बैठकीत रमेशराव आडसकर साहेब यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदपवार) गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष संजिवनीताई देशमुख आणि युवा नेते ईश्वर शिंदे असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमासाठी अंबा नगरीचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अंबा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन दत्ताअबा पाटील, बबना लोमटे, बालासाहेब शेप, तालुका अध्यक्ष राजेभाऊ औताडे, महादेव आदमाने, सह पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.