नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये 12 तरूणांना टॅटू काढणे चांगलेच महागात पडले आहे. कारण त्यांना एचआयव्हीची लागण झाली आहे. जी सुई टॅटू काढताना एचआयव्ही बाधीत तरूणाला वापरली तीच सुई इतर तरूणांना वापरल्याने त्यांना एचआयव्हीची लागण झाली आहे. “हा विषाणू हवेच्या संपर्कात आल्याने नष्ट होतो. त्यामुळे सुई द्वारे एचआयव्हीची लागण होण्याची शक्यता फार कमी आहे,” असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. 12 youths infected with HIV after sharing same needle while tattooing Uttar Pradesh Varanasi
तरुण-तरुणी वेगवेगळे डिझाइन्स आणि आकारांचे टॅटू बनवतात. टॅटू काढल्यानंतर १२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाराणीसीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एचआयव्ही झालेल्या व्यक्तीमध्ये १० मुलं आणि २ मुलींचा सामावेश आहे.
एचआयव्ही बाधित व्यक्तीला टॅटू काढताना वापरलेली सुई इतरांना वापरल्याने १२ जणांना एचआयव्हीची लागण झाली आहे. सध्या तरुण-तरुणींमध्ये टॅटू काढण्याचे प्रमाण वाढत आहे. टॅटू काढण्यासाठी वापरण्यात येणारी साधनं निर्जंतुक न केल्यामुळे १२ जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे बोलले जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ मठाधिपतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल, बेदम मारहाण, पुण्यात उपचार
बीड : बीडच्या अंमळनेर येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाभाऊ खाडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहरी गावात एका मंदिराचे बांधकाम पाहण्यासाठी खाडे आले असता त्यांना एका व्यक्तीने घरी येण्याचे निमंत्रण दिले. त्यावेळी महाराजाचे सोने या कुटुंबाने लुटले, अशी फिर्याद महाराजाने पोलीसांत दिली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत महाराजाने बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने दाखल केली.
पीडित महिलेलं आपल्या तक्रारीत, खाडे यांनी संमतीशिवाय शारीरिक संबंध ठेवले असल्याचा आरोप केलाय. लग्न करण्याचं आमीष दाखवून आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोपही पीडितेनं केलेल आहे. गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास खाडे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
हनुमान गडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाभाऊ खाडे महाराज यांच्याविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. गुन्हा नोंद झाल्यावर महाराजांना ग्रामस्थांनी बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. यात गंभीर जखमी महाराजांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, मारहाण करून साडेतेरा लाख रुपये लुटल्याची तक्रार महाजारांनी यापूर्वी दिली होती. तसा गुन्हा नोंद झाला आहे. खर्डा (ता. जामखेड) पोलिस ठाण्यात दोन्ही गुन्हे नोंद आहेत.
जामखेड तालुक्यातील मोहरी गावातील घुगे वस्ती येथे महादेव मंदिराचे बांधकाम सुरू आहे. ते पाहण्यासाठी खाडे महाराज २९ जुलैला गेले होते. त्यावेळी बाजीराव गीते यांनी महाराजांना घरी येण्याचे निमंत्रण दिले. पहाटेच्या सुमारास बाजीराव गीते, भिवा गोपाळघरे, अरुण गीते, राहुल संपत गीते, रामा गीते यांनी मारहाण करून अंगावरील १३ लाख ६० हजार रुपयांचे दागिने लुटल्याची फिर्याद महाराजांनी खर्डा पोलिस ठाण्यात दिली.