पॅराग्वे, 24 जून (हिं.स.) पॅरिस
डायमंड लीगमध्ये शानदार कामगिरी करून हंगामातील पहिला विजय मिळवल्यानंतर नीरज चोप्राने आता आपले लक्ष्य ऑस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक २०२५ वर
केंद्रित केले आहे. या स्पर्धेत नीरज पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. दुखापतींच्या
कारणामुळे त्याला या स्पर्धेत याआधी सहभागी होता आलं नाही. त्यामुळे आज होणाऱ्या
या स्पर्धेत नीरज अव्वल स्थान काबीज करणार का याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष असणार
आहे.
दोहा
डायमंड लीगमध्ये त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची झलक दाखवली होती.
९० मीटर भालाफेकत त्याने रौप्य पदक
पटकावले होते. यानंतर पॅरिस डायमंड लीगमध्ये त्याने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
आता ५ जुलै रोजी पहिल्या नीरज चोप्रा
क्लासिकसाठी बंगळुरूला परतण्यापूर्वी ही नीरजची शेवटची स्पर्धा असेल. त्यामुळे या
स्पर्धेतही तो अव्वल स्थानी विराजमान होण्यास सज्ज आहे.