बंगळुरु, 5 जुलै (हिं.स.)
ऑलिंपिक
विजेता नीरज चोप्राची नीरज चोप्रा क्लासिक स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. या
स्पर्धेच्या निमित्ताने भारतात पहिली जागतिक अॅथलेटिक्स उच्चस्तरीय स्पर्धा होणार
आहे. नीरज चोप्रा त्याचे आयोजन करत आहेत. ही स्पर्धा बंगळुरूमधील श्री कांतीरवा
स्टेडियममध्ये रंगणार आहे. नीरज या वर्षी दुसऱ्यांदा ९० मीटर भाला फेकण्यासाठी प्रयत्न
करणार आहे. नीरज चोप्रा क्लासिक सारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धा विशेषतः भारतीय
चाहत्यांसाठी आयोजित केल्या जात आहेत. नीरजने स्वीडिश पोल व्हॉल्टर अर्मांडो
डुप्लांटिस आणि केनियाचा लांब पल्ल्याचा धावपटू किपचोगे केनो यांच्याकडून प्रेरणा
घेतली आहे.
भारतातील कोणत्याही स्पर्धेतील सर्वात मोठी
आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा ठरली आहे. ज्याला जागतिक अॅथलेटिक्सने ‘अ’
श्रेणीचा दर्जा दिला आहे. दरम्यान, जर्मनीचा ज्युलियन वेबर, ग्रेनडाचा अँडरसन पीटर्स याच्यासह काही मोठ्या
भालाफेकपटूंनी आपली नावे या स्पर्धेतून मागे घेतली आहेत. पण प्रेक्षक नीरजबद्दल उत्सुक आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १२ भालाफेकपटूंपैकी
पाच असे भालाफेकपटू आहेत जे वर्षाच्या अखेरीस टोकियो येथे होणाऱ्या जागतिक
अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
नीरजने
जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स, अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि वर्ल्ड अॅथलेटिक्स यांच्या
सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. एनसी क्लासिक स्पर्धा दरवर्षी आयोजित केली
जाणार आहे. आणि भविष्यात भालाफेकसह त्यात आणखी खेळ जोडले जाणार आहेत. एनसी क्लासिक
स्पर्धा यापूर्वी २४ मे रोजी हरियाणातील पंचकुला येथे होणार होती. पण
आंतरराष्ट्रीय प्रसारकांच्या आवश्यकतेनुसार प्रकाश व्यवस्था नसल्याने ते बंगळुरू
येथे आयोजित केले जात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील
लष्करी संघर्षामुळे या स्पर्धेंचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं होतं.